Mangaon GramPanchayat esakal
कोल्हापूर

विधवा प्रथा बंदीनंतर माणगाव ग्रामपंचायतीचा आणखी एक अनोखा उपक्रम; आता मुलीच्या लग्नात देणार 'संसारोपयोगी साहित्य'

माणगाव ग्रामपंचायतीने ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेंतर्गत  संसारउपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात विविध ऐतिहासिक योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या माणगाव ग्रामपंचायतीने ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेंतर्गत संसारउपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतलाय.

रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने (Mangaon Gram Panchayat) ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेअंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गावातून लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी (Girl) संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबत निर्णय झाला असून या‌ नावीन्यपूर्ण योजनेची सुरुवात स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून होणार आहे, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.

राज्यात विविध ऐतिहासिक योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या माणगाव ग्रामपंचायतीने ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेंतर्गत  संसारउपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गावातील एकूण सरासरी २५ मुलींची लग्ने होतात. एका मुलीकरिता अकरा हजार रुपये खर्च आहे. एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मुलगीचे लग्नावेळचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे व अर्जासोबत जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.

लग्न ठरल्यानंतर ग्रामपंचायतीस रितसर अर्ज करून या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी मुलीच्या आई- वडिलांनी करायची आहे. संसारोपयोगी साहित्यामध्ये या गोष्टींचा समावेश संसारोपयोगी साहित्यामध्ये मिक्सर, कुकर, स्टील फिल्टर, पिंप, ताट, वाटी, पेले, तांब्या, कढई, झारा, पातेली, ईडली पात्र, बादली, घागर, सांडशी, उलतने, पळी, भातवाडी, बरणी, किटली, प्लेट, चमचे, टिफिन डबा, भांड्याचा रॅक, डबे, लाकडी पाट, इस्त्री, कुटुंबसंवर्धन पुस्तिका संच देणार आहे.

पदाधिकारी देणार मानधन

सरपंच व उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांना मिळणारे मानधन ‌यासाठी देण्यात येणार असून, ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात ‌येणार आहे. योजनेच्या लाभासाठी‌ मुलीचे आई- वडील  गावचे रहिवासी असणे बंधनकारक आहे, अशी माहिती उपसरपंच अख्तर भालदार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT