Maratha Community Survey esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : मराठा समाजाचे 98 टक्के सर्वेक्षण पूर्ण; 468 कुटुंबांनी दिला सर्वेक्षणास नकार

मराठा समाजाच्या सर्वेक्षणादरम्यान (Maratha Community Survey) जिल्ह्यातील ४६८ कुटुंबांनी या सर्वेक्षणास नकार दिला.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यात ९८.५८ मराठा समाजाच्या कुटुंबांचे सर्वेक्षण आज पूर्ण झाले.

कोल्हापूर : मराठा समाजाच्या सर्वेक्षणादरम्यान (Maratha Community Survey) जिल्ह्यातील ४६८ कुटुंबांनी या सर्वेक्षणास नकार दिला. गगनबावडा, राधानगरी, गडहिंग्लज व हातकणंगले तालुक्यांत सर्वेक्षणास नकार दिलेले एकही कुटुंब नाही. जिल्हा प्रशासनाने ही आकडेवारी आज जाहीर केली.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने राज्यभर मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याची सूचना शासनाला केली होती. त्यानुसार २४ जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू झाले.

३१ जानेवारी ही सर्वेक्षणाची अखेरची तारीख होती, पण शासनाने २ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या सर्वेक्षणाला मुदतवाढ दिली होती. ग्रामीण भागात महसूल विभागामार्फत तर शहरात महापालिकेकडील शाळांतील शिक्षकांकडून हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. या सर्वेक्षणासाठी ऑनलाईन प्रश्‍नावली तयार केली होती. त्यात तब्बल १८१ प्रश्‍न प्रत्येक कुटुंबाला विचारण्यात आले होते.

त्यात विवाहाची पध्दत, पती निधनानंतरच्या प्रथा, सरकारी नोकरीत कोणी आहे का? हुंडा घेतला जातो का? शिक्षण कुठे घेतले, मुलांचे विवाह करताना काय बघता आदी प्रश्‍नांचा समावेश होता. हे सर्वेक्षण करताना अनेक प्रश्‍नांवर मराठा समाजातील लोकांनी आक्षेप घेतला होता, तर काही ठिकाणी मोबाईलची रेंज न मिळाल्याने त्यात अडथळे येत होते. एका कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अशा अनेक अडचणींवर मात करत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

जिल्ह्यातील ४६८ कुटुंबांचा सर्वेक्षणास नकार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यात ९८.५८ मराठा समाजाच्या कुटुंबांचे सर्वेक्षण आज पूर्ण झाले. गगनबावडा व हातकणंगले तालुक्यात हे सर्वेक्षण शंभर टक्के झाले असून, जिल्ह्यातील सहा लाख ७८ हजार ५४८ कुटुंबांपैकी सहा लाख ६८ हजार ९२५ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४६८ कुटुंबांनी सर्वेक्षणास नकार दिला. गेल्या नऊ दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरू होते. शहरात महापालिकेकडील शिक्षकांकडून, तर ग्रामीण भागात महसूल विभागाकडून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

दृष्टिक्षेपात सर्वेक्षण

तालुका कुटुंब संख्या सर्वेक्षण पूर्ण कुटुंबे टक्केवारी उपलब्ध न झालेली कुटुंब संख्या नकार दिलेली कुटुंबे

  • करवीर १,०९,०८५ १,०७,९०२ ९८.९१ १०९५ ८९

  • गगनबावडा ७५९९ ७५९९ १००.०० ० ०

  • राधानगरी ४४,८१८ ४३,३८९ ९६.८१ १४२९ ०

  • कागल ६१,८०९ ६१,१४८ ९८.९३ ६१७ ४४

  • गडहिंग्लज ५३,१६६ ५२,८४३ ९९.३९ ३२३ ०

  • चंदगड ४१,६४३ ४१,४४६ ९९.४८ २१३ ४

  • हातकणंगले ६३,०२३ ६३,०२३ १००.० ० ०

  • शिरोळ ८२,८४९ ८२,३०६ ९९.३४ ४१९ १२४

  • पन्हाळा ५४,४२१ ५३,९६८ ९९.१७ ४०८ ४५

  • शाहूवाडी ४०.९०९ ३९,४९७ ९६.५५ १४०७ ५

  • भुदरगड ३५,५०५ ३४,८८१ ९८.२४ ६०३ २१

  • आजरा ३१,५७७ २९,०९५ ९२.१४ २४८१ १

  • इचलकरंजी शहर ५२,१२३ ५१,८२८ ९९.४३ १६० १३५

  • एकूण : ६,७८,५४८ ६,६८,९२५ ९८.५८ ९,१५५ ४६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT