Congress leader Satej Patil support Manoj Jarange-Patil esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांच्या 'त्या' भूमिकेला आमचा पाठिंबा; काय म्हणाले काँग्रेस नेते सतेज पाटील?

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या भूमिकेसोबतच आम्ही सारे आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आता राज्य सरकारने सभागृहात मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी.

कोल्हापूर : ‘मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या भूमिकेसोबतच आम्ही सारे आहोत. मात्र, आता सरकारने सभागृहात याबाबतची भूमिका स्पष्ट करावी,’ असे मत विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. धर्मवीर संभाजीराजे स्मारक लोकार्पण कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुकीचे टप्पे आवर्जून असावेत. मात्र, ते निवडणूक आयोगाशिवाय इतर कुणाच्या सोयीचे नसावेत. विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून सर्वत्र भारतीय जनता पक्षाने प्रचार सुरू केला आहे. मात्र, सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेले नाही. त्यामुळे असे कितीही प्रयत्न केले तरी लोकच योग्य तो निर्णय घेतील.’

‘कोल्हापूर महापालिकेचा विचार करता निधी येतो. पण, वर्कऑर्डर निघत नाहीत. त्यामुळे अधिकारी कुणाच्या तरी दबावाला बळी पडून काम करत आहेत, हे स्पष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला विरोध झाला. अशा कामांसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे’, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT