Maratha Reservation leader Manoj Jarange-Patil esakal
कोल्हापूर

मनोज जरांगे-पाटलांच्या सभेचे फलक हटविले; महापालिकेकडून मोठी कारवाई, पक्षपात झाल्याची तक्रार

जरांगे-पाटील यांची सभा अराजकीय असल्याची लेखी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

महापालिकेची परवानगी न घेता फलक लावण्यात आल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात आले आहे.

बेळगाव : बेळगावात मंगळवारी (ता. ३०) होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेबाबत जागृती करण्यासाठी लावण्यात आलेले फलक महापालिकेकडून (Belgaum Municipality) हटविण्यात आले आहेत. रविवारी (ता. २८) रात्री उशिरा महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या सभेला विलंबाने का होईना, महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, फलक हटविण्याची कारवाई करून महापालिकेने नाराजी ओढवून घेतली आहे.

शहरातील विविध पाच ठिकाणी लावण्यात आलेले फलक हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे. शहरातील संभाजी उद्यान येथे ही सभा होणार आहे. या सभेच्या परवानगीलाही महापालिकेकडून विलंब लावण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत संभाजी उद्यान येथील सभेला परवानगी दिली जात नव्हती, पण जरांगे-पाटील यांची सभा अराजकीय असल्याची लेखी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. त्यानंतर महापालिकेकडून रितसर लेखी परवानगी देण्यात आली.

प्रारंभी आयुक्त पी. एन. लोकेश व महसूल उपायुक्त गुरुनाथ गड्डे यांनी ‘आधी पोलिसांची परवानगी घेऊन या’ अशी सूचना आयोजकांना दिली होती. मात्र, अखेरीस त्यांनी परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर या सभेची जागृती करणारे मराठी भाषेतील फलक (Marathi Board) शहरात लावण्यात आले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री फलक हटविण्याची सूचना महसूल व अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आली. त्यानुसार या दोन्ही विभागांनी मोहीम राबवून फलक हटविले आहेत.

महापालिकेची परवानगी न घेता फलक लावण्यात आल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात आले आहे, पण गेल्या दोन आठवड्यात उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनेक विना परवाना शुभेच्छा फलक लावले आहेत, त्या फलकांवर मात्र महापालिकेने कारवाई केलेली नाही. महापालिकेने जरांगे-पाटील यांच्या सभेच्या फलकांवर केलेली कारवाई पक्षपाती असल्याची टीका मराठी भाषिकांकडून केली जात आहे.

जागृती न होऊ देण्याचा उद्देश?

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनामुळे जरांगे-पाटील चर्चेत आले. कर्नाटकातील मराठा समाजामध्येही ते लोकप्रिय आहेत. कर्नाटकातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जुनी मागणी आहे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून २०१७ साली बेळगावातही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. आता जरांगे पाटील यांच्या सभेनंतर आरक्षणाची मागणी नव्याने सुरू होणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक काळात होत असलेली ही सभा राजकीयदृष्ट्याही परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या सभेची जागृती होऊ नये, या उद्देशाने फलक हटविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT