कोल्हापूर : गेल्या वर्षीच आमच्या राजूच्या लग्नाचा बार उडवायचा होता; पण कोरोना आला अन त्याची नोकरी गेली, काय कामधंदा नसल्यानं घरीच हाय त्यो, राजूचं लगीन काय जुळना, यंदा तरी काय घडल वाटत व्हंत तवर ह्यो, कोरोना आला, अशा व्यथांचे सूर ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या आई-वडिलांकडून ऐकू येत आहेत. कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्न जुळणे कठीण झाले आहे.
पोराला नवरी शोधण्यासाठी पालकांना गावोगावी, पाहूण्यांकडे फिरावे लागत आहे. तरुणांची लग्ने ठरणे ही मोठी सामाजिक समस्याच बनली आहे. चांगल्या, निर्व्यसनी शेतकरी तरुणांची लग्न जोडणीची प्रक्रिया थांबली आहे. कोरोनामुळे नोकरी गेल्याने शहरातून परतलेल्या तरुणांची स्थिती बिकट आहे. कोरोनामुळे छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या या तरुणांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. याचा परिणाम तरुणांच्या लग्नावर झाला आहे.
प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात जावी, अशी अपेक्षा असते. मुलगी व पालक नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती देतात. टाळेबंदीत अनेक तरुणांच्या हातच्या नोकऱ्याच गेल्याने मुलींकडून नकाराला सामोरे जावे लागते. या समस्यामुळे मुलांसहीत पालकांना ही नैराश्याचा सामना करावा लागत आहे.
गेल्या वर्षी शहरातून गावात आलेले काही तरुण पुन्हा शहरात परतले; पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परत नोकरी जाणार का? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. नोकरीच्या अनिश्चितमुळे बरेच युवक खेड्यातच रमले आहेत. शेती किंवा अन्य व्यवसाय करतत. परंतु नोकरदारच मुलगा हवा या अटीमुळे तरुणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे.
शेतकरी नवरा नको गं बाई...
लग्न जोडणी करताना मुलाच्या घरदार, नोकरीसह शेतीचा विचार केला जातो. मुलाकडे शेती किती याला महत्त्व दिले जायचे. मात्र मुलगा शेती करतो असे सांगितले की, मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव पुढे येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.