इचलकरंजी : कोरोना संसर्गाचा फटका यंदा विवाह नोंदणीला बसला आहे. यावर्षी पहिल्या तीन महिन्यात नोंदणी प्रक्रिया सुरळीत होती. मात्र कोरोना संसर्ग वाढल्यानंतर एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात नोंदणी पूर्णतः ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना निर्बंधामुळे अनेक विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले. तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच विवाह पार पडले. त्याचाही परिणाम नोंदणीवर झाला आहे.
साधारणपणे जानेवारीनंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. पावसाळा सुरु होईपर्यंत विवाहांचा धुमधडाका असतो. त्याप्रमाणे यंदाही वर्षाच्या सुरुवातीला अनेक विवाह सोहळे पार पडले. नंतर मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पून्हा विवाह सोहळ्यांवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले. अगदी 25 जणांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली. त्यातच कारवाईच्या धसक्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले.या सर्व परिस्थीतीचा परिणाम विवाह नोंदणीवर झाल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्याच्या कालावधीत पालिकेच्या विवाह नोंदणी विभागाकडे 205 विवाहांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये जानेवारीमध्ये 84, फेबु्रवारीमध्ये 58 व मार्चमध्ये 63 विवाहांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर मात्र या विभागाकडील कर्मचारीही कोरोनाच्या कामात व्यस्त राहिले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात एकदी अगदी एक - दोन विवाहांची नोंदणी करण्यात आली.
विवाह नोंदणी न केल्यास अनेक अडचणी येतात. विशेष करुन पासपोर्ट काढणे, आधार कार्ड काढणे, नोकरीतील बदली करुन घेणे अशा विविध कामांसाठी विवाह नोंदणी आवश्यक असते. त्यामुळे अलिकडे जन्म-मृत्यूच्या नोंदीप्रमाणे विवाह नोंदणी करण्याबाबत अनेकजण सतर्क असतात. त्यामुळे नेहमी पालिकेच्या विवाह नोंदणी विभागात वर्दळ असते. पण आता गेली दोन महिने विवाह नोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
विवाह नोंदणी दृष्टीक्षेप
सन संख्या
2018 441
2019 455
2020 401
2021(मार्च अखेर) 205
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.