memories of Former President of Kolhapur Natya Parishad Manohar Kuigade 
कोल्हापूर

गजरा मोगर्‍याचा आणि अबोलीचा...

सुधाकर काशिद

 कोल्हापूर - कोल्हापूर नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध बाबला ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे तसेच अनेक नाट्य प्रयोगांचे 25 हून अधिक वर्षे यशस्वी आयोजन केलेले जेष्ठ व आदरणीय व्यक्ती श्री मनोहर कुईगडे ( वय 85) यांचे  खरी कॉर्नर येथील पद्माराजे हायस्कूल समोरील त्यांच्या निवासस्थानी आज (ता. १९)बुधवारी पहाटे निधन झाले.


या दादांच नाव मनोहर कुईगडे. यांच्या पत्नीचे नाव अरुंधती. कहानी गेल्या काही वर्षापासूनची आहे. मनोहरदादा कोल्हापुरातले नाट्य व्यवसायिक. चांगली चांगली नाटके त्यांनी कोल्हापुरात आणली आणि केशवराव भोसले नाट्यगृहात रसिकांच्या समोर सादर केली. या व्यवसायात बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाले. त्यांची पत्नी अरुंधती यांनी त्यांना खूप साथ दिली. काही वर्षांपूर्वी अरुंधती वहिणींचे निधन झाल्. दादा काही काळ जरूर खचले. एक दिवस आपली पत्नी अरुंधतीच्या छायाचित्राकडे पहात राहिले अरुंधती वहिनी खांद्यावर पदर घेतलेल्या, कपाळावर ठळक टिकली लावलेल्या आणि केसात मोगर्‍याचा छान गजरा घातलेल्या. फोटोच्या फ्रेममध्येही  जीवंत भासत होत्या. मनोहरदादा उठले. त्यांनी तिच्या छायाचित्राला नमस्कार केला. घराबाहेर पडले. महाद्वार रोडवर आले. मोगर्‍याचा चांगला हातभर गजरा घेतला. घरी आले, त्या गजऱ्याचा हार त्यांनी अरुंधती वहिनींच्या छायाचित्राला घातला आणि तिथून पुढे तो प्रघातच पडला. मनोहरदादा रोज बाहेरून येताना मोगरा किंवा अबोलीचा गजरा विकत घेऊन यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ताजा ताजा गजरा तिच्या फोटोला घालायचे. क्षणभर डोळे मिटायचे. नमस्कार करायचे आणि आपल्या कामाला बाहेर पडायचे. एक दिवस त्यांनी कधी हा क्रम चुकवला नाही वहिनींच्या फोटोवर ताजा गजरा नाही असे कधीच घडले नाही. मोगरा किंवा अबोलीचा मंद सुगंध कधी हटला नाही
.

आज पहाटे(19 ऑगस्ट)  मात्र खूप वाईट घडले. ८१ वर्षाच्या मनोहर दादांचे निधन झाले. मोगऱ्याच्या गजऱ्यातल फुलं गळून पडले. पत्नी प्रेमाच्या अध्यायाच एक पान उलटलं गेलं. दादांना दोन मुलं विश्वजीत व ऋषिकेष. सुना नातवंड खूप चांगली आहेत. आता मोगऱ्याचा सुगंध त्यांना जीवंत ठेवायचा आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT