Minister Chandrakant Patil esakal
कोल्हापूर

Chandrakant Patil : 'तुमचा नेता अमेरिकेत बसून आरक्षण घालवतो म्हणतोय अन् आम्ही आरक्षण घालवणार असं सांगत सुटलाय'

सकाळ डिजिटल टीम

''केसरकर माझे चांगले मित्र असून, मी त्यांच्याशी बोलणार आहे. अंतिम निर्णय आमचे नेतृत्व असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.''

कोल्हापूर : देशात आधी एकच निवडणूक होती. ते तुम्ही बदलले. तुमचा नेता अमेरिकेमध्ये बसून आरक्षण घालवतो असे म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार असं सांगत सुटला आहात, असे खडेबोल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोधकांना सुनावले. ‘एक देश-एक निवडणूक’ झाली की, विकासकामे करण्यासाठी वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन संकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वादग्रस्त विधानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीत काय तक्रार करणार मला माहीत नाही. त्यांना विचारले पाहिजे काय तक्रार करणार आहेत. त्यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी काय म्हटले हेही त्यांना विचारा. संजय राऊत काय; पण बोलतात, त्यांचा हात कोण धरणार? असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

‘सारथी’च्या फेलोशिपबाबतचा माझा प्रस्ताव वेगळा होता. त्याला अर्थविभागाची मान्यता मिळाली नाही. बार्टी, आरटी, सारथी यांना समान फेलोशिप देण्याचा सरकार विचार करेल. राज्यातील ४३ पॉलिटेक्निकला प्रत्येकी ४० संगणकांचे संच दिले आहेत. डिप्लोमाकडे विद्यार्थी आकर्षित झाले असून, तेथील प्रत्येक बॅच ५० विद्यार्थ्यांची करण्याची तयारी असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी कोथरुडमधून विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केल्याच्या प्रश्नावर मंत्री पाटील यांनी सांगितले की, मलाही ते समजल्यानंतर आश्चर्य वाटले. निवडणुकांमध्ये अशा घटना घडतात. केसरकर माझे चांगले मित्र असून, मी त्यांच्याशी बोलणार आहे. अंतिम निर्णय आमचे नेतृत्व असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.

'कोल्हापूर उत्तर'वर भाजपचा दावा : महाडिक

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबाबत मंत्री पाटील म्हणाले की, ज्यावेळी अनेक पक्षांनी एकत्रित येऊन काम करायचे असते. त्यावेळी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीवर दावा करायचा असतो. मग, नेत्यांनी येऊन कोणाचा दावा योग्य आहे ते ठरवायचे असते. त्यानुसार महायुतीच्या जागा वाटपाबद्दल आमचे त्रिमूर्ती निर्णय घेतील. ज्यांना आमच्या राजेश क्षीरसागर यांनी त्रिदेव म्हटले आहे. दरम्यान, या मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने लढविली आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’वर आमचा दावा असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT