Minor Girl Abortion esakal
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा गर्भपात? खासगी रुग्णालयातील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यामुळे एका पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

लुमाकांत नलवडे

गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे वाढते प्रकार पाहता या संवेदनशील घटनेत स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष दिले तर वस्तुस्थिती पुढे येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा गर्भपात (Minor Girl Abortion) करून सर्व प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे; पण ही माहिती लपविण्यापासून ते कागदपत्रात फेरफार करण्यासाठी रूग्णालयापासून ते पोलिस ठाण्यापर्यंत एक साखळी कार्यरत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

दरम्यान, याबाबत एका पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे; पण गर्भपात प्रकरणी संशयित डॉक्टर आणि रुग्णालयावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी एक यंत्रणा गतीमान झाली आहे. केवळ बारा-पंधरा दिवसांत या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहे. तपासात त्रुटी राहिल्यास संशयितांना अभय मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

इचलकरंजी परिसरातील एका अलिशान खासगी रुग्णालयात अल्‍पवयीन मुलीचा गर्भपात झाल्याचे खात्रीशीर माहिती आहे; मात्र प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेने वेगवेगळी कागदपत्रे रंगविली जात आहेत. याला काहींनी कळत नकळत दुजोराही दिला आहे. गुन्हा दाखल होऊ शकतो, यामुळे आता दुसरीच शस्त्रक्रिया झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यामुळे एका पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करताना संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता वेळीच होणे अपेक्षित होते. शिवाय रुग्णालयानेही त्याबाबतची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास आणि संबंधित वैद्यकीय यंत्रणेस देणे बंधनकारक होते.

मात्र, ही प्रक्रिया टाळून गर्भपात केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सांगण्यात येते. गुन्हा दाखल झाल्यानंतर कागदपत्रांच्या आणि जबाबातील माहितीनुसार गर्भपात झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुढील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तपास अधिकारी नसल्यामुळे पुढील तपास थांबला आहे.

लवकरच नवीन महिला अधिकारी या पदावर येतील. त्यांच्याकडून तपास पूर्ण करून अहवाल उपअधीक्षकांकडे पाठविला जाईल. त्यानंतर वेळेत दोषारोप पत्र दाखल केले जाईल. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालय दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल. कोणालाही अभय दिले जाणार नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे वाढते प्रकार पाहता या संवेदनशील घटनेत स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष दिले तर वस्तुस्थिती पुढे येण्याची शक्यता आहे. दबावाखाली येवून कारवाई टाळली तर मात्र असे अनधिकृत प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तपासासाठी अधिकारीच उपलब्ध नाही

संबंधित सर्व घटना संशयास्पद असल्यामुळे कोल्हापुरातील एका शासकीय समितीने त्याचा अहवाल चौकशी करून सादर केला आहे. त्यामध्ये एका डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचा अहवाल दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र तोही बदलण्‍याची शक्यता असल्याचे समजते. हा तपास सुरू असताना संबंधित तपास अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्यानंतर पुढील अधिकारीच तपासासाठी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे सर्व प्रकरण काही दिवस ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT