मुरगूड : निपाणी - फोंडा रस्त्याची दैनीय आवस्था ही माजी बांधकाममंत्री चंद्रकांत दादांनी दिलेली महान देणगी आहे. असा टोला राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी लगावला. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आमदार आबीटकर मुरगूड येथे आले असता निपाणी - फोंडा राज्यमार्गाच्या दैनीय आवस्थेबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडले त्यावेळी ते बोलत होते.
कामाचा दर्जा आणि दिरंगाई याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर तातडीने संबंधित अधिकाऱ्याला मंत्रालयातून फोन येतात.आणि कारवाई थांबवली जाते. अशी नागरिकांतून चर्चा आहे? या प्रश्नांचे उत्तर देताना आमदार आबिटकर म्हणाले, सध्याची स्थिती पाहता या ठेकेदाराला महाराष्ट्र राज्य स्वतःच्या इच्छेनुसार चालते असे वाटते.
तशी या ठेकेदारांची भावना झाली आहे. खरे तर या रस्त्याच्या दुर्देशेला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधीत अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. गेल्या दोन वर्षापासून जितेंद्रसिंग या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची नुसतीच वल्गना सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहेत. प्रत्यक्षात मात्र कारवाई कांहीच करत नाहीत. त्याचे कारण ही तसेच असे सांगून ते म्हणाले, कंपनीला काळ्या यादीत टाकल्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील बरेचसे अधिकारी लटकणार आहेत. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःची कातडी वाचवण्यासाठी या रस्त्यावर सामान्य नागरिकांचा जीव गेला तरी त्याची पर्वा करणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर हे सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे. आणि तसा आरोप उघडपणे होत आहे. असे विचारले असता प्रकाश आबिटकर म्हणाले, आपण वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या दिरंगाईबद्दल पाठपुरावा केला आहे. पण संबंधित अधिकारी हे कंपनीच्या कंपनीच्या दबावाखाली या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहताना दिसत नाहीत.
मुरगूडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनादरम्यान मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी जाणून बुजून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. व आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला अशी आंदोलकांची भावना आहे. प्रश्नाकडे लक्ष वेधले असता आमदार आबिटकर म्हणाले, ठेकेदार कंपनी व संबंधितांची मुजोरी त्याच वेळेस जनतेने मोडून काढायला हवी होती. तरीदेखील या प्रश्नी लक्ष घालत आहे. जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न ही कंपनी करत आहे. ज्याला खरोखरच काम करायचे आहे. ते कधीही असे करणार नाहीत. या ठेकेदाराला हे कामच करायचे नाही तरी पण सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या मागे लागलाय हे गौडबंगालच आहे असेही आमदार आबीटकर म्हणाले.
यावेळी नगरसेवक संदीप कलकुटकी, दत्तात्रय मंडलिक, आनंदा मांगले, अनिल राऊत, नवनाथ सातवेकर, रणजीत भारमल, नवनाथ सातवेकर, प्रशांत शिरसेकर, विशाल मगदूमआदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.