मुंबई - तीन दिवसीय ‘यिन’ अधिवेशनाचा आज तिसऱ्या दिवशी समारोप झाला. शेवटच्या दिवशी यिन मंत्रिमंडळाने विधान भवनाला भेट देऊन माहिती जाऊन घेतली.
यावेळी यिन मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आम्ही ही लवकरच आमदार होऊन खऱ्याखुऱ्या सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवू, असा निर्धार व्यक्त केला.
मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली.
यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व सर्व पदाधिकाऱ्यांनी विधान भवनाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विधानसभा, विधान परिषद सभागृह पाहिले. त्यातील बैठक व्यवस्था, कामकाजाची माहिती माहिती घेतली.
तसेच विधान भवनातील सभापती, उपसभापती, मंत्री, अधिकाऱ्यांच्या दालनालाही भेट दिली. यावेळी सदस्यांनी आपल्या मनातील शंकांचे निरसनही करून घेतले. विधान भवनातील चीफ रेकॉर्डिस्ट नंदू वाघ यांनी सदस्यांना माहिती दिली.
राज्याचा कारभार जेथून चालतो, ते सभागृह पाहून आम्ही भारावलो. अनेक विषयांची माहिती आम्हाला जाऊन घेता आली. भविष्यात आम्हीही येथे जनतेचे प्रतिनिधी म्हणून नक्कीच येण्याचा प्रयत्न करू.
- आचल डवले, मुख्यमंत्री, ‘यिन’ मंत्रिमंडळ
आयुष्यात पहिल्यांदाच विधान भवनाला भेट दिली. ही संधी केवळ आणि केवळ ‘यिन’मुळेच मिळाली. आणखी जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- काजल चव्हाण, उपमुख्यमंत्री, ‘यिन’ मंत्रिमंडळ
तीनदिवसीय अधिवेशन आणि विधानभवनातील भेटीमुळे आपण खरोखर लोकप्रतिनिधी झाल्याचा भास झाला. अनेक प्रश्नांचा ऊहापोह झाला. लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.
- चिराग काटेखाय, विरोधीपक्ष नेता
विचार परिवर्तन हवे असेल, तर आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या समतोल साधला पाहिजे. वैचारिक परिवर्तनानंतरच तुम्ही काम करण्यास सज्ज व्हाल.
त्यातून दहा टक्के लोकांची जरी मानसिकता बदलली, तरी एखादा उपक्रम हाती घेणे सोपे जाईल; अन्यथा केवळ चर्चाच होईल, बदल होणार नाही.
यासाठी आपण ‘यिन’च्या माध्यमातून दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करू. त्यानेच आपण एखादे यशस्वी मॉडेल लोकांसमोर दाखवू शकतो.
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.