Rohini Nakshatra Muhurat esakal
कोल्हापूर

Monsoon Season : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात; कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात पेरण्यांना गती

मॉन्सून (Monsoon) लवकरच केरळमध्ये दाखल होईल.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील प्रत्येक शेतात आणि शेतकरी कुटुंबात खरिपाच्या पेरण्यांची जोरदार तयार सुरू आहे. आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. मॉन्सून (Monsoon) लवकरच केरळमध्ये दाखल होईल. याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातही संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहिले. यातच पारंपरिक पद्धतीसह आधुनिक तंत्राच्या सहायाने पेरणी करत रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त (Rohini Nakshatra Muhurat) साधला.

विशेषत: कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात पेरण्यांनी सर्वाधिक गती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतात आणि शेतकरी कुटुंबात खरिपाच्या पेरण्यांची जोरदार तयार सुरू आहे. आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रानुसार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, याच मुहूर्तावर बळीराजाने पेरणीसाठी कुऱ्या हातात घेतल्या आहेत. जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. चांगले आणि दर्जेदार बियाणांची निवड करून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७७१ क्विंटल बियाणांची पेरणी केली जाणार आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका, नाचणी, सोयाबीसह इतर कडधान्यांचा समावेश आहे. या सर्व बियाणांची खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांकडून गर्दी केली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ठिक-ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र ऊस आणि पेरणीच्या शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करतात. तर, हातकणंगले तालुक्यात अद्याप शेतीच्या मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे किंवा स्वत:चे पाणी देता येते, अशा ठिकाणी पेरणीची धांदल उडाली आहे. दरम्यान, आज ज्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यात पावसाचे वातावरण चांगले वाटत आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतालाही चांगली घात आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्याचा यंदा चांगला योग आला आहे.

-यशवंत पाटील, शेतकरी, बामणी (ता. कागल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT