कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी वकिलांच्या खांद्यावर असल्याचे मत आज 'नाबार्ड'चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित वकिलांच्या न्यायिक परिषदेला येथील लोणार वसाहत परिसरातील महाराजा बॅक्वेट हॉलमध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, खासदार संभाजीराजे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासंबंधी कायदेशीर स्तरावर नेमकी कोणती पावले उचलता येतील, यासाठी या परिषदेत मंथन होणार आहे. पाच जिल्ह्यातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले आहेत. ऍड. आशिष गायकवाड, ऍड. श्रीराम पिंगळे, ऍड. राजेंद्र दाते, ऍड. रणजीत गावडे, ऍड. विवेक शुक्ल आदी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
सकल मराठा क्रांती मोर्चाचे प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, राजू लिंग्रस, दिलीप देसाई, ऍड. गुरूप्रसाद माळकर, ऍड. बाबा इंदूलकर, मधुकर बिरंजे, प्रशांत मोरे आदींनी संयोजन केले आहे. दरम्यान, 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा व भारतीय संविधानाचे पूजन करून परिषदेला प्रारंभ झाला.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.