कोल्हापूर

Mothers Day Special: आईचे ते दोनच शब्द अन् मनावरचा ताण होतो हलका

नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर :आई (Aai)म्हणजे वात्सल्‍य, मनातील गुपित सांगण्याचं हक्काचं ठिकाण, ती कधी ओरडते, कधी रागावते अन् तितकंच भरभरून प्रेमही करते. त्यामुळेच प्रत्येकाला आई श्रेष्ठ वाटते. आई अडाणी असो की शिक्षित, याला फारसे महत्त्व नसते, ती आपल्याशी केवळ दोन शब्द प्रेमाने बोलल्यावर मनावरचा ताण हलका होतो. मात्र, याच आईचा छंद काय, तिला काय आवडते, तिची जन्मतारीख काय, अशा अनेक गोष्टींविषयी आपल्याला नक्की कितपत माहिती असते बरं? ‘सकाळ’ने ‘मातृदिना’च्या (Mothers Day Special Sakal survey)पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणात याचा झालेला खुलासा असा

Mothers Day Special Sakal survey found children of all ages

‘मदर्स डे’ करण्याच्या आधुनिक पद्धती

७१.१ टक्के जणांनी ‘मदर्स डे’ साजरा करीत असल्याचे सांगतानाच आईला घरकामातून पूर्ण विश्रांती देऊन त्या दिवशी तिच्या आवडीचे पदार्थ बनवित असल्याचे सांगितले. केक कापून किंवा आईबरोबर संपूर्ण दिवस व्यतित करून हा दिवस अविस्मरणीय बनवत असल्याचे काहींनी सांगितले.

आईच्या आवडत्या डिश

आईला आवडणाऱ्या पदार्थांची नावे मात्र पटापट सर्वांनीच सांगितली. कोणी मांसाहारीत चिकन, पांढरा- तांबडा रस्सा, बिर्याणी आवडत असल्याचे सांगितले; तर काहींनी आईला पालेभाज्या, चमचमीत पदार्थ, पनीर, कांदाभजी, पुरणपोळी आवडत असल्याचे मत नोंदविले.

१. तुमच्या आईची जन्मतारीख माहीत आहे का?

होय- ९०.४

नाही- ९.३

२. अलीकडच्या काळात आईच्या जवळ बसून गप्पा मारल्यात का?

होय- ९०.८

नाही- ९.२

३. आईच्या आवडीचे ठिकाण किंवा पर्यटनस्थळ तुम्हाला माहीत आहे का?

होय- ९०.८

नाही- ९.२

४. आईची आवडती मालिका, नाटक माहीत आहे का?

होय- ८२.९

नाही- १७.१

५. आईचा आवडता छंद किंवा तिला अवगत असणारी कला तुम्हाला माहीत आहे का?

होय- ९३.४

नाही- ६.६

६. आईचे शिक्षण किती झाले आहे, तुम्हाला माहीत आहे का?

होय- १००

नाही- ०

७. आई फक्त गृहिणीच असावी, असे तुम्हाला वाटते का?

होय- २.६

नाही- ९७.४

८. आईबरोबर फिरायला तुम्ही एकटेच कधी गेलाय का?

होय- ६९.७

नाही- ३०.३

९. आईच्या अत्युच्च आनंदाच्या क्षणाबाबत तुम्हाला माहीत आहे का?

होय- ९०.८

नाही- ९.२

१०. आईशी तुम्ही १०० टक्के खरे बोलताय का?

होय- ७१.१

नाही- २७.६

कधीतरी- १.३

११. तुम्ही आईबरोबर ‘मदर्स डे’ साजरा केलाय का?

होय- ७१.१

नाही- २८.९

Mothers Day Special Sakal survey found children of all ages

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT