MP Dhananjay Mahadik Anna Bhau Sathe esakal
कोल्हापूर

Dhananjay Mahadik : लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना 'भारतरत्न' द्या; खासदार महाडिकांची मोदी सरकारकडे मागणी

सकाळ डिजिटल टीम

''साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा.’'

कोल्हापूर : ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली. अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे,’ अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी के

राज्यसभेत बोलताना महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, ‘अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्‍या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाटक आणि प्रवासवर्णन लिहिले आहे. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभाव, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी लेखणीतून आवाज उठवला.

त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झाला आहे, तर महिला, दलित, शोषित, पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केले. साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime News: १५९ कोटी रुपयांची फसवणूक अन् मथुरेत संताचा वेश, बीडचा बनब शिंदे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

Share Market Today: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Urmila Matondkar Divorce: लग्नाच्या ८ वर्षांनंतर मोहसीन मीरपासून विभक्त होणार उर्मिला मातोंडकर? दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Onion Import: दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात! पंजाबमध्ये 11 मालट्रकद्वारे दाखल; महाराष्ट्रात संतापाची लाट

Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई, कोकणामध्ये जोरदार बरसणार

SCROLL FOR NEXT