कोल्हापूर

विषयच हार्ड! कोल्हापुरात भरले 100 खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन

मतीन शेख

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मृत्यूचे सापळे बनलेल्या शहरातील 100 खड्ड्यांच्या फोटोंचे खुले प्रदर्शन दसरा चौकात भरवण्यात करण्यात आले होते. जनसंघर्ष सेनेकडून आयोजित या प्रदर्शनातून यावेळी महापालिकेच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा निषेध करण्यात आला. शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, ताराबाई पार्क उपनगरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे. रस्त्यांची दुरावस्था असतानाही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले. दसरा चौकात भरलेल्या या प्रदर्शनाला शहरवासीयांनी फोटो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

प्रदर्शनाच्या माध्यमातून रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून पंधरा दिवसात प्रशासनाकडून रस्त्यांच्या कामाबाबत कार्यवाही न झाल्यास महापालिकेत आयुक्त कार्यालयात ५०० फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी यावेळी दिली. जनसंघर्ष सेनेचे सुनील थोरवत, संदेश पोलादे, सतीश कदम, वैभव पाटील,संग्राम जाधव, प्रथमेश पोवार, यश पोवार, अक्षय कांबळे, मूबीन मुश्रीफ, प्रथमेश मुळीक, राजस जोशी, हर्षद पडवळ, अमित चव्हाण, मितेश संकपाळ, मयूर संकपाळ आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT