Murder Case Rajwada Police esakal
कोल्हापूर

Kolhapur : अनैतिक संबंधातून वन विभाग सर्व्हेअरचा डोक्यात दगड घालून खून; रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला भास्करचा मृतदेह

भास्करला मी मारला नसता तर त्याने मला मारले असते.

सकाळ डिजिटल टीम

भास्करने तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून युवराजला मारहाण करण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून काल रात्री मंगळवार पेठेतील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ अंधारात वन विभागातील (Forest Department) सर्व्हेअरचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. भास्कर शंकर कांबळे (वय ५०, रा. अनाजे, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणातील संशयित फळ विक्रेता युवराज बळवंत कांबळे (२७, रा. कुडुत्री, ता. राधानगरी) थेट जुना राजवाडा पोलिस (Rajwada Police) ठाण्यात हजर झाला. तेथे त्याने अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

पोलिसांनी सांगितले, की भास्कर कांबळे वन विभागात सर्व्हेअर होते. त्यांच्या पत्नीचे आणि युवराज कांबळेचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांना संशय होता. यासाठी दोघांमध्ये वारंवार वाद झाले होते. अखेर हा वाद मिटविण्यासाठी दोघांनीही कोल्हापुरातील वारे वसाहत येथील मित्राकडे यायचे ठरले होते.

यासाठी मंगळवारी वारे वसाहतीतील मित्राने युवराजला दूरध्वनी केला होता. त्यानुसार काल सायंकाळी युवराज आणि भास्कर वारे वसाहत परिसरातील मित्राच्या घरी भेटले. तेथे त्यांनी स्टॅम्पवर लिहून घेण्याबाबत चर्चा केली. येथून पुढे कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत, याचीही खात्री दिली. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले.

युवराज त्याच्या दुचाकीवरून वारे वसाहतमधून मंगळवार पेठेतील मोजणी कार्यालयाच्या मागील रस्त्यावरून जयप्रभा स्टुडिओकडे येत होता. त्यावेळी भास्कर पाठीमागून आला. त्याने त्याला मंदिराशेजारी अंधारात रस्त्यावरच अडविले. तेथे दोघांचा पुन्हा एकदा वाद झाला. दोघेही दुचाकीवर होते. यावेळी भास्करने तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यात गाड्या रस्त्यावर पडल्या. झटापटीत दोघेही रस्त्याच्या कडेला गेले. तेथे भास्करने युवराजला मारहाण केली. यावेळी भास्कर आता सोडणार नाही, भीतीने युवराजने रस्त्याकडेला पडलेला दगड थेट भास्करच्या डोक्यात घातला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर युवराज स्वतःच्या दुचाकीवरून थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथे त्याने मी एकाच्या डोक्यात दगड घातला आहे. तो जिवंत आहे की नाही बघायला जावा, असे सांगितले.

त्यामुळे पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी पोचले. घटनास्थळी दोघांची झटापट झाल्यामुळे तेथेच रस्त्यावर साधारण पन्नास-साठ फुटावर भास्करची दुचाकी पडली होती. रस्त्याकडेला भास्करचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दिसला. थोड्याच वेळात तेथे बघ्यांची गर्दी झाली. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी तेथे आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तेथून सीपीआरमध्ये हलविला.

मी मारले नसते तर...

काळा फाटलेला टी शर्ट घातलेला संशयित कांबळे पोलिस ठाण्यात थांबून घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना देत होता. भास्करला मी मारला नसता तर त्याने मला मारले असते. गेल्या काही दिवसांत तो माझ्या घरी येऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले. तो घाबरलेला होता; मात्र घडलेली सर्व हकिकत पोलिसांना स्पष्टपणे सांगत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT