Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : 'बोटं तोडली, आता तुला तोडणार..'; नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर खुनी हल्ला

‘बोटे तोडली, तुला तोडणार...’ अशा खुन्नसमधून आजचा हल्ला झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

हल्ल्यानंतर पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत आणि बोंद्रेनगरमध्ये बंदोबस्त ठेवला आहे. हल्ल्याचे पडसाद उमटू नयेत, यासाठी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिसांनी दक्षता घेतली आहे.

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत-बोंद्रेनगरातील पूर्ववैमनस्यातून शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात भरदुपारी थरारक पाठलाग करून तरुणावर खुनी हल्ला झाला. यामध्ये प्रकाश बबन बोडके (वय २३, रा. बोंद्रेनगर) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हात, मान व पाठीवर तलवारीने वार केले आहेत. त्याचा हाताचा पंजा तुटला आहे.

त्याचा साथीदार संभाजी पांडुरंग फाले (२७, नृसिंह कॉलनी, बोंद्रेनगर) जखमी झाला. त्याच्या हातावरही तलवारीचा वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतचा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जखमी फाले याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दहा जणांनी निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक दरम्यान हातात नंग्या तलवारी घेऊन पाठलाग करून खुनी हल्ला केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तीन-चार पथके हल्लोखोरांच्या तपासासाठी रवाना झाली आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी, दोन दुचाकींचा शोध पोलिस घेत आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी रात्री पत्रकारांना दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील गजबजलेल्या निवृत्ती चौकात आज दुपारी दोनच्या सुमारास जखमी प्रकाश बोडके आणि संभाजी फाले पानपट्टीवर थांबले होते. तेथे एका दुचाकीवरून तिघे, तर एका दुचाकीवरून दोघे आले. त्यांच्याकडून हल्ला होणार असे दिसताच बोडके आणि फालेने तेथून पळ काढला. दहा जणांनी त्यांचा साधारण दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला. बोडके निवृत्ती चौकातून उभा मारुती चौकाकडे पळत सुटला. यावेळी इतरांनी त्याचा नंग्या तलवारी घेऊन पाठलाग केला.

बोडके गजानन सदनातील एका खासगी कार्यालयात घुसला. तेथे असलेल्या महिलांना काही कळण्यापूर्वीच पाठीमागून पाच ते सात जण कार्यालयात घुसले. बोडके जिन्यावर जात असताना त्याच्यावर तलवारीचे सपासप वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडून राहिला. यावेळी खासगी कार्यालयातील महिला तेथून बाहेर पळून गेल्या. बोडकेवर वार करून हल्लेखोर रंकाळ्याच्या दिशेने पळून गेले. यानंतर बघ्यांची गर्दी वाढली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बोडकेला तरुणांनी उचलून नेऊन सीपीआरमध्ये दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्यासह पोलिसांनी तातडीने भेट दिली. यानंतर पोलिसांनी तीन पथके ठिकठिकाणी रवाना केले. जखमींना सीपीआरमधून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याचा आणि त्याच्या साथीदाराचा जबाब घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

बदला घेण्यासाठी हल्ला

‘बोटे तोडली, तुला तोडणार...’ अशा खुन्नसमधून आजचा हल्ला झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. मागील वर्षी मेमध्ये या दोन्ही गॅंगमध्ये झालेल्या हल्ल्यात एकाची तीन बोटे तोडण्यात आली होती. त्याचा वर्षाच्या आतच बदला घेण्याची चर्चा होती. त्यानुसार ३१ मे या अखेरच्या दिवशीच हा खुनी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. लक्ष्मीपुरीच्या पोलिस रेकॉर्डवरसुद्धा तीन बोटे तोडल्याचा गुन्हा नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लक्षतीर्थ, बोंद्रेनगरमध्ये बंदोबस्त

हल्ल्यानंतर पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत आणि बोंद्रेनगरमध्ये बंदोबस्त ठेवला आहे. हल्ल्याचे पडसाद उमटू नयेत, यासाठी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिसांनी दक्षता घेतली आहे. बोंद्रेनगर- लक्षतीर्थ वसाहत येथे वर्चस्वाच्या वादातून गतवर्षी मे मध्येच संतोष बोडके आणि प्रकाश बोडके गॅंगमध्ये पोस्टर फाडल्यावरून वाद झाला होता. पोलिसांनी संतोष बोडकेवर सुमारे १२ गुन्हे दाखल असल्यामुळे नुकतेच स्थानबद्ध केले. त्यामुळे सध्या तो येरवडा कारागृहात आहे. एक वर्षानंतरही तेथील वर्चस्वाचा वाद आजही धुमसत आहे.

दहा जणांवर गुन्हा दाखल

संशयित हल्लेखोर युवराज शेळके, कृष्णात बोडेकर, केदार घुर्के , करण शेळके, राहुल हेगडे, राजू बोडके, विकास ऊर्फ चिक्या यांच्यासह अनोळखी तिघे अशा दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT