मुरगूड: जितेंद्रसिंग कंपनीने याRoad work started केल्यानंतर काही दिवस सुरळीतपणे काम केले. त्यानंतर मात्र कामाला ग्रहण लागले. कामगारांचा पगार वेळेवर नाही, भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या वाहनांची बिले थकली, कामांच्या नियोजनाचा अभाव, विविध ठिकाणचे रखडलेले जागाभाडे अशा कारणांतून ठेकेदार कंपनीची मुजोरी वाढत गेली. त्यामुळे कामगारांचे वारंवार संप होत आहेत. येत्या आठवड्यातही कामगार संप करणार असल्याचे समजते.
मुदाळतिट्टा ते कुरुकली या ११ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार होणारे अपघात, उठणारे धुळीचे प्रचंड लोट व यामुळे होणारे श्वसनाचे आजार, मणका, कंबरदुखीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाहिजे त्या ठिकाणी मोरी खोदून ठेवायच्या आणि खंदक निर्माण करुन ठेवायचे.
काही काही ठिकाणी तर दोन दोन वर्षे मोऱ्या खोदून ठेवल्या आहे. त्या आहे, त्या स्थितीतच आहेत. प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याने या मार्गावर अनेकांनी जीव गमावला आहे. तर कित्येकजण अधू झाले आहेत.
रस्त्याच्या बाजूपट्ट्या खोदून ठेवून त्यावर कच्ची खडी टाकली आहे. रात्री प्रवास करताना प्रवाशांची गाडी घसरुन अपघात होतात. निढोरी ते आदमापूर, मुरगूड, वेदगंगा नदीवरील पुलापासून शहराच्या हद्दीपर्यंत माधवनगर ते शिंदेवाडी, शिंदेवाडी ते यमगे, सुरुपली भावेश्वरी मंदिर ते यमगे, सुरुपली ते कुरुकली अशा सर्वच ठिकाणी रस्ता बेदरकारपणे खोदून ठेवला आहे. या सगळ्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.