कोल्हापूर

दोन दिवसात काॅंग्रेसच्या 2 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार; चंद्रकांतदादांचा इशारा

Balkrishna Madhale

Kirit somaiya vs Hasan mushrif : भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधल्यानंतर सोमय्यांनी हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) 'टार्गेट' करण्यास सुरुवात केलीय. आज सोमय्या यांनी, अप्पासाहेब गडहिंग्लज साखर कारखान्यात मुश्रीफांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट केला, तर या त्यांच्या आरोपाला उत्तर देताना मुश्रीफांनी म्हंटलंय, की अशा बिनबुडाच्या आरोपांना आम्ही भिक घालत नाही. तर सोमय्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुश्रीफांचा चांगलाच समाचार घेतला, त्यांनी राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केलीय. एकंदरीत आज कऱ्हाडात भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली होती.

काेणी ऑफर दिली, लेटर घेऊन थाेडीच फिरत असताे; फडणवीसांचा मुश्रीफांना टाेला

आरोप करणाऱ्या सोमय्यांवर जिल्हाबंदीची कारवाई का?, चंद्रकांतदादांचा सवाल

शरद पवार घोटाळेबाजांच्या पाठीशी कधीच उभे राहणार नाहीत

कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, कोल्हापुरी चपलेनं नाही

मुश्रीफांच्या घोटाळ्यावर सतेज पाटलांची चुप्पी का?, मुश्रीफांना भाजपची कोणतीही ऑफर नव्हती : चंद्रकांतदादा

सरकारकडून सिस्टिम मोडण्याचं काम, माजी खासदाराला कसं काय रोखू शकता?, चंद्रकांतदादांचा सवाल

राष्ट्रवादीला पैशाचा माज फक्त गृहखात्यामुळेच, चंद्रकांतदादांचा घणाघात

दोन दिवसात काॅंग्रेसच्या 2 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार; चंद्रकांतदादांचा इशारा

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; काॅंग्रेस, शिवसेनेला केवळ गाजर दाखवण्याचं काम

गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे देऊ नका, चंद्रकांतदादांनी उध्दव ठाकरेंना केली होती विनंती

98 कोटीच्या फेक एन्ट्री कोठून आल्या, मग ईडीला उत्तर द्या : चंद्रकांत पाटील

हॅममध्ये घोटाळा होता, तर तुम्ही काय झोपा काढत होता; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांवर पलटवार

ईडीची लढाई लढताना तोंडाला फेस येईल : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी पुरषार्थ दाखवून लढाई लढावी - मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापूर जिल्ह्यातलं चंद्रकांत पाटलांचं अपयश लपवण्यासाठी माझ्यावर आरोप : मुश्रीफ

भाजपमध्ये येण्याची ऑफर - मुश्रीफांचा गौप्यस्फोट

जरंडेश्वर कारखाना एक आदर्श कारखाना; सोमय्यांचे अजित पवारांवरील आरोप बिनबुडाचे, मुश्रीफांनी झापलं

भाजपचे सर्व घोटाळे बाहेर काढणार, महाविकास आघाडीतील नेत्यांना मुश्रीफांनी दिल्या सूचना

शरद पवारांवर टीका करण्याची सोमय्यांची लायकी आहे का?, मुश्रीफांचा घणाघात

भाजपात चिक्की घोटाळा झाला, त्याचं काय झालं? मुश्रीफांचा सोमय्यांना सवाल

किरीट सोमय्या न्यायाधीश झाले का? त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार : मुश्रीफ

किरीट सोमय्यांच्या सीए पदवीवर मुश्रीफांनी व्यक्त केला संशय

दहा वर्षापर्यंत भाजपला महाराष्ट्रात यश मिळणार नाही. कोल्हापुरात भाजप शून्यच, मुश्रीफांची टीका

केंद्रीय तपास यंत्रणेचा भाजपकडून गैरवापर सुरु : हसन मुश्रीफ

केंद्राच्या इशाऱ्याने राज्य सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुरावे असतील, तर राज्यातील यंत्रणांकडे तक्रार करा. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत - संजय राऊत

सोमय्यांच्या आरोपाला मुश्रीफ देणार उत्तर, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर ठाकरे पिता पुत्र कारवाई का करत नाही - सोमय्या

महाराष्ट्र सरकार आणि दिलीप वळसे पाटील विरुद्ध लढणार - सोमय्या

कागल पोलीस स्टेशनला तक्रार करायला पुन्हा येणार - सोमय्या

उद्धव ठाकरे यांना सवय आहे धमक्या देण्याची अशा धमक्यांना मी भीक घालत नाही - सोमय्या

३० तारखेला अजित पवार यांनी घोटाळा केलेल्या जरंडेश्वर कारखान्याची चौकशी पाहणी करणार - सोमय्या

पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार - सोमय्या

अप्पासाहेब गडहिंग्ज साखर कारखान्यात मुश्रीफांचा 100 कोटी रुपयांचा घोटाळा - सोमय्यांचा गौप्यस्फोट

मुश्रीफांविरोधातील घोटाळ्याची माहिती उद्या ईडीला मुंबईत देणार - सोमय्या

हसन मुश्रीफ यांचे घोटाळे उघड कऱण्याची फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सूचना - सोमय्या

मुश्रीफांविरोधात ईडीला पुराव्यासह माहिती देणार - सोमय्या

मुश्रीफांविरोधातील ईडीच्या कारवाईच्या भितीने माझ्यावर कारवाई करण्यात आली का?- सोमय्यांचा सवाल

मुश्रीफांच्या निरोगी आरोग्यासाठी सोमय्या यांच्या शुभेच्छा

बनावट आदेश दाखवणाऱ्या पोलिस आधिकाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी - सोमय्या

पोलिसांच्या कारवाईंविरोधात हायकोर्टात जाणार - सोमय्या

सोमय्यांना मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी आदेश दिले - सोमय्या

मुंबई पोलिसांनी सीएसटीएम स्थनकांवर धक्काबुक्की केली. काल सहा तास मला पोलिसांनी घरात कोंडून ठेवलं- सोमय्यांचा आरोप

२७०० पेजेसचे पुरावे घेऊन कोल्हापुरात तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं तर तक्रारदाराला तक्रार करण्याआधीच रोखण्यात आलं. मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही आपण आपल्या पोलिसांना कोणत्या आदेशाअतंर्गत गणेश विसर्जनापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान केलं - सोमय्या

कोल्हापूरला जाताना रोखल्यानंतर सोमय्या कराडमधून लाईव्ह

घोटाळा उघड करणाऱ्यांना अटक करणारे सरकार - सोमय्यांचा हल्लाबोल

हे सरकार घोटाळेबाज सरकार आहे -सोमय्या

हसन मुश्रीफ यांच्यामुळे सोमय्यांना अंबे मातेचं दर्शन करता आलं नाही - सोमय्या

कोल्हापूरातील राजकारण तापण्याची शक्यता, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार. सकाळी 9 वाजात किरीट सोमय्या, 11 वाजता हसन मुश्रीफ तर साडेअकरा वाजता चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. नेमके काय आरोप केले जाणार? मुश्रीफ काय प्रत्त्युतर देणार.. याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

कऱ्हाडच्या सर्किट हाऊसकडे जाणारा रस्ता बंद करून तेथे पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

कऱ्हाड पोलिसांनी किरीट सोमय्यांना नजरबंद ठेवलं आहे.

कोल्हापुरात येण्यास किरीट सोमय्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असून त्यांच्याविरोधात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

किरीट सोमय्या आज पत्रकार परिषदेत (कऱ्हाड) हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहेत.

किरीट सोमय्यांविरोधात आज हसन मुश्रीफ 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

सोमय्यांच्या पाठिब्यासाठी पुण्यात चंद्रकांत पाटील यांची 11 वाजता पत्रकार परिषद असणार आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळाही बाहेर काढणार आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी कऱ्हाडात झालेल्या पत्रकार परिषेदत दिला आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ दाखवून लढाई लढावी, सोमय्यांच्या मागे चंद्रकांत पाटील हेच सूत्रधार आहेत. भाजपचे नेत्यांकडून किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांचा वापर सुरु आहे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी केला.

सोमवारी (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police) संयुक्तरित्या ही कारवाई केली. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होता. त्यावेळी कऱ्हाडला थांबण्यास ते तयार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT