Namo Shetkari Maha Samman Yojana esakal
कोल्हापूर

Government Scheme : तब्बल 'इतक्या' हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बंद; तिन्ही हप्त्यांचा लाखो रुपये निधीचा लाभच मिळालेला नाही!

Namo Shetkari Maha Samman Yojana : पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जिल्ह्यातील चार लाख ९३ हजार २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कुंडलिक पाटील

शेतकरी सन्मान योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता, तसेच ई-केवायसी केली आहे; पण अद्याप नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एकही हप्ता जमा झालेला नाही.

कुडित्रे : ‘पीएम किसान’ योजनेच्या (PM Kisan Scheme) धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Maha Samman Yojana) निधीचे तीन हप्ते प्राप्त झाले आहेत. मात्र, बँक खाते (Bank Account) बंद अवस्थेत असल्याने जिल्ह्यातील सतरा हजार शेतकऱ्यांना तिन्ही हप्त्यांचा लाखो रुपये निधीचा लाभ मिळालेला नाही. चौथा हप्ता जुलैअखेर मिळण्याची शक्यता असताना शेतकरी मागील हप्ता मिळण्यासाठी कृषी खात्याकडे (Agriculture Department) हेलपाटे मारत आहेत.

‘पीएम किसान’ योजनेतून केंद्र शासनाचे सहा हजार व राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हजार, असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. ‘पीएम किसान’चा एप्रिल ते जुलै २०२३ मध्ये १४ व्या हप्त्यावेळी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता २६ ऑक्टोबर २०२३ रोजी व माहे ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ तसेच माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत १५ व १६ व्या ‘पीएम किसान’च्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता २८ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये भूमिअभिलेख खात्यानुसार नोंदी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या चार लाख ८९ हजार २७१, भूमिअभिलेख नोंदणी व पीएफएमएस (वित्त प्रणाली) झालेल्या शेतकऱ्यांची संख्या चार लाख ७५ हजार २६९, ई-केवायसी, भूमिअभिलेख व आधार संलग्न या तिन्ही बाबी पूर्ण झालेल्या शेतकरी खातेदारांची संख्या चार लाख ७० हजार ३१७ इतकी आहे.

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जिल्ह्यातील चार लाख ९३ हजार २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेतील अनेक शेतकरी लाभार्थ्यांचे यूआयडी जुळत नाहीत. बँक खाती बंद आहेत. यामुळे पहिल्या हप्त्यातील २०५७ शेतकऱ्यांमध्ये यूआयडी न जुळलेले, तर यामध्ये बँक खाते बंद असलेल्या आठ हजार ६७० शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये ३०४ यूआयडी जुळत नाहीत. ४४५३ शेतकऱ्यांचे बँक खाते बंद आहे. तिसऱ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये ४२३ यूआयडी जुळत नाहीत, तर ४४४५ शेतकऱ्यांचे बँक खाते बंद आहे. या सर्व बाबींमुळे तिन्ही हप्त्यांचा २० हजार ३५२ शेतकऱ्यांना लाभ देता आलेला नाही.

शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी सुरू आहे. महसूल, तहसीलदार व बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. बँक खाती सुरू झाल्यानंतर सर्व प्रलंबित अनुदान मिळेल.

-अजय कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक

शेतकरी सन्मान योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता, तसेच ई-केवायसी केली आहे; पण अद्याप नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एकही हप्ता जमा झालेला नाही. शासनाने लवकरात लवकर निधी खात्यावर जमा करावा.

-राजेंद्रसिंह पाटील, शेतकरी, सावर्डे दुमाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Latest Maharashtra News Updates : थोड्याच वेळात शिवसेनेचा नेता निवडला जाणार

SCROLL FOR NEXT