Sharad Pawar Group Jayakumar Shinde resigned esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : शरद पवारांना धक्का! कोल्हापुरातील 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील काही ईडीला घाबरलेल्या आणि तथाकथित नेत्यांनी माझ्या मुलाला नोकरी लावण्याकडे कानाडोळा केला.

कोल्हापूर : ‘गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलो. पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून काम करत राहिलो. यामुळे कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. हातातोंडाशी आलेल्या मुलाने कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत जीवन संपवलं.

अशा कठीण परिस्थितीत पक्षाचे स्थानिक नेते पाठबळ देतील अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी दुर्लक्ष, कानाडोळा करत एक प्रकारे मला झिडकारलेच. इतकी वर्षे पक्षाची ईमानेइतबारे सेवा करूनही ही अवहेलना सहन न होणारी आहे. त्यामुळे मी हतबल होऊन पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे (Jayakumar Shinde) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘माझ्यासारखी अवस्था करून घेऊ नका. घरचं बरं तरच राजकारणात खरं आहे. आधी रोजगार करा. कुटुंब सांभाळा आणि मग राजकारणात काम करा, असा भावनिक सल्ला शिंदे यांनी तरुण कार्यकर्त्यांना दिला. शिंदे म्हणाले, ‘पुलोद, काँग्रेस (आय), काँग्रेस (एस) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत राहिलो. विविध सामाजिक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. प्रसंगी तुरुंगवासही झाला. अजून नऊ केसेस अंगावर आहेत. त्यावेळी ‘राष्ट्रवादी’सह इतर पक्षातील काही चांगल्या नेत्यांनी साथ दिली.

त्यामुळे संसार चालविताना, मुलांचे शिक्षण पूर्ण करताना काही अडचण वाटली नाही. मात्र, जिल्ह्यातील काही ईडीला घाबरलेल्या आणि तथाकथित नेत्यांनी माझ्या मुलाला नोकरी लावण्याकडे कानाडोळा केला. पत्नी पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने सध्या वयाच्या ६७ वर्षी माझी परिस्थिती वाईट झाली आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहणार असून, कोणत्याही पक्षात जाणार नाही.’

मुलाचा पगार अजून मिळाला नाही

‘जिल्हा परिषदेत कंत्राटी तत्त्‍वा‍वर माझा मुलगा काम करत होता. कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने त्याने जीवन संपवलं. त्याला जाऊन वर्ष होत आले, तरी अद्याप त्याचा तीन महिन्यांचा पगार देखील मिळालेला नाही. नेत्यांनी त्याच्या नोकरीसाठी लक्ष दिले असते, तर तो आज जिवंत असता आणि माझं म्हातरपण चांगले गेले असते,’ असे सांगताना शिंदे यांचे डोळे पाणावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT