ncp supriya sule farmer laws criticize bjp government farmer in kolhapur letest news marathi news 
कोल्हापूर

भाजपमध्ये अनेकजण वैतागलेले; सुप्रिया सुळेंच मोठ वक्तव्य

अर्चना बनगे

कोल्हापूर: भाजपचे धोरण हे जनतेसाठीच नव्हे तर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसाठीही धोक्याचे आहे, अशा आशयाचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणाऱ्या कार्यकर्त्यां संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी भविष्यात अनेक जण भाजप पक्षाला रामराम ठोकतील, असा अंदाज वर्तवला. कोल्हापूरातील जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्किट हौऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.   


यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते पक्ष सोडून आपल्याकडे येत आहेत, याबाबत त्यांना विचारण्यात आले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपमध्ये दडपशाहीचे धोरण आहे. या धोरणाला कंटाळून अनेकजण तो पक्ष सोडत आहेत. त्या पक्षात दडपशाही आहे, हे मला माहित आहे. त्यामुळे भविष्यातही अनेकजणांनी हा पक्ष सोडला तर आश्‍चर्य वाटायचे कारण नाही.

याशिवाय त्यांनी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले.  त्या म्हणाल्या की,  शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केंद्र सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. केवळ दिखावा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.  हे सरकार असंवेदनशील आहे. आंदोलकांशी पोलिसाकडून चांगली वागणूक मिळत नाही. निधी वाटपावेळी केंद्राकडून महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही सूड भावनेचा दिसतो, अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT