कोल्हापूर : लाल सलाम, लाल सलाम एन. डी. पाटील लाल सलाम, एन. डी. पाटील (N.D.Patil)अमर रहे, अशा घोषणांत ज्येष्ठ कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आज अनंतात विलीन झाले. कसबा बावड्यातील (Kasba Bavda) स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुभाष व प्रशांत यांनी भडाग्नी दिला.
राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेते, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावली. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बावड्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. बावड्यातील रस्त्यांवर त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बावड्यातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा थांबून होते.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
एनडी पाटील यांनी नेहमी शेतकरी कामगार पक्षाशी असलेली बांधिलकी जपली. कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळात झालेला टोलचा लढ्यातही ते आक्रमक होते. कोणतंही सरकार असेल तरी, कष्टकरी, शेतकरी, आणि वंचित समाजाच्या विरोधातील निर्णयांविरोधात संघर्ष सूरू करयाचे. सीमावादाबद्दल देखील त्यांचा अभ्यास दांडगा होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसह, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनोहर शिंदे, खासदार संजय मंडलिक, काकी शितल पाटील यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार आणि निपानीचे आमदार काका पाटील यांनीही अत्यंदर्शन घेतले आहे. सरला पाटील, भारत पाटणकर यांनीही अत्यंदर्शन घेतले आहे.
एडींना शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने लाल सलाम दिला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी लाल निशाण अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्यावर आज दुपारी साडेबारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे एन. डी. पाटील यांचे अत्यंदर्शनानंतर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत.
अंनिसचे अविनाश पाटील, खासदार धैर्यशील माने, महसुली मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार धनंजय महाडिकही अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलिप वळसे-पाटील, पार्थ पवार अंत्यदर्शनसाठी दाखल झाले आहेत. उल्का महाजन सेझ लढ्यात डॉ. एन. डी पाटील यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. मुक्ता दाभोलकर यांनीही अंत्यदर्शन घेतले आहे.
मंडप उभारला आहे. येथे पिठावर सकाळी साडेसात वाजता डॉ. एन.डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. अरे पून्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे शिर्षक लिहिले ला फलक डॉ. एन. डी.च्या कार्यकर्तत्वाचे चेतना जागृत करीत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, यांनी सरोज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांचे सदस्य उपस्थित आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून सामाजिक शैक्षणिक राजकीय आली क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी येऊ लागले. मंत्री हसन मुश्रीफ , सतेज पाटील, आमदार रोहीत पवार, प्रकाश आवाडे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्य दर्शन घेतले.
डॉ एन.डी. पाटील यांचे पार्थिव शाहू कॉलेजमध्ये दाखल झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. दुपारी साडेबारा वाजता एन.डी. पाटील अंत्यसंस्कार होणार आहेत. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत ते पार पडतील.
प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील ढवळी (ता. वाळवा) या गावी १५ जुलै १९२९ रोजी एका गरीब व निरक्षर शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच, तर माध्यमिक शिक्षण तेथून आठ मैलांवर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील माध्यमिक शाळेत झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे वाळवा तालुका हे मुख्य केंद्र होते. त्यामुळे स्वातंत्र्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडूही त्यांना येथेच मिळाले. महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ संग्रामात त्यांनी विद्यार्थिदशेतच उडी घेतली. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या सामाजिक जीवनाला प्रारंभ झाला. पुढे राजाराम महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची बी. ए., एम. ए. व एल. एल. बी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते रयत शिक्षण संस्थेचे अविभाज्य घटक बनले. संस्थेतील विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना बदलत्या काळानुसार नवे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण संस्थाही सुरू केल्या. कर्मवीर विद्याप्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी लोकमानस घडवण्यासाठी अनेक प्रयोग केले.
सहकारमंत्री म्हणूनही काम
सुमारे अठरा वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५-१९९० या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसेच काही काळ विरोधी पक्षनेते होते. १९७८-८० या अवधीत ते महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री होते; पण जनतेने दिलेले प्रतिनिधित्व आणि शासकीय सत्तापदे त्यांनी सामाजिक न्यायासाठीच वापरली. आमदारकी असो किंवा प्राध्यापक म्हणून काम करताना मिळालेल्या मानधनातली एक दमडीही स्वतःसाठी किंवा स्वतःच्या संसारासाठी त्यांनी कधी वापरली नाही. ही सारी रक्कम पहिल्यापासून त्यांनी समाजासाठीच दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.