कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या (kolhapur rain update) मदतीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या गुजरात, बडोद्यासह अन्य राज्यातून दाखल होत आहेत. एकूण सहा तुकड्या दाखल होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत तीन विमानातून तीन तुकड्यांतील सुमारे 60 जवान दाखल झाले आहेत. (kolhapur flood live) रात्रीपर्यंत आणखी तीन विमानातून 40 जवान दाखल होणार आहेत. (NDRF) महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. (kolhpur update)
जिल्ह्यात 24 तासांत 212 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे महापुराने हाहाकार माजवला आहे. अनेक जनावरे वाहून गेली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मदत करण्याची गरज असल्याने ६ एनडीआरएफच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापुरात दाखल झालेल्या ३ एनडीआरएफ तुकड्यांकडे स्वत:च्या बोटी, लाईफ जॅकेट, लाईट, जनरेटर सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व साहित्य त्यांच्यासोबत आहे. कोल्हापूर विमानतळावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. ज्या ठिकाणी पूरग्रस्तांना स्थलांतरित करायचे आहे, अशा ठिकाणी या तुकड्या पाठवण्यात येणार असून याचा समन्वय जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती कटारिया यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.