new 125 corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

Big Breaking-कोल्हापुरात कोरोनाचा हाहाकार ; दिवसभरात तब्बल सव्वाशे जणांना लागण  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासनून साठ, सत्तर, पन्नास अशा संखेने वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १२५ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ५६१ वर पोहोचली आहे. यातील १८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजवर एकूण ८७८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील आठ शासकीय रुग्णालयांत ४४४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

पहाटे एक वाजता १७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यानंतर सकाळी दहा वाजता २५, त्यानंतर ३३, ३० आणि आता आणकी २० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात तब्बल १२५ नव्या रूग्णांची भर पडली आहे. 

जिल्ह्यातील सहा शासकीय रूग्णालयातून हे अहवाल येत आहेत. त्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज येथून आज सर्वात जास्त रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आहे आहेत.  

इचलकरंजीत उद्रेक थांबेना 
इचलकरंजी शहरात आज कोरोनाचा उद्रेक झाला. दिवसभरात तब्बल २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून लाखेनगर परिसरातील तब्बल बाराजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पालिकेच्या एका अधिकाऱ्यासह सहा सफाई कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 
इचलकरंजीत कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. मंगळवारी चौघांचा मृत्यू झाला होता तर आज आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये पाटील मळा येथील वृध्दाचा आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. तर लिगाडे मळा  परिसरातील सोळा वर्षाच्या तरुणाचा मिरज शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६ वर पोहचली आहे.


दरम्यान, शहरात आजही कोरोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सकाळी नऊ जण पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये भोने माळ मधील बाधीत डॉक्टरांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. तर एका यंत्रमाग संघटनेच्या अध्यक्षालाही कोरोना झाला आहे. सांयकाळी आलेल्या यादीत १८ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यामध्ये लाखे नगर मधील 12 जणांचा समावेश आहे. या परिसरातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर आजच्या यादीत  सहा सफाई कर्मचारी बाधीत झाले आहेत. 
 याशिवाय जुना चंदुर रोड, गुजर माळ, टाकवडे वेस, प्रियदर्शनी कॉलनी,  टिळक रोड गावभाग येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

दिवसभरात पाच मृत्यू

दरम्यान, आज दिवसभरात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कसबा बावडा येथील एक, यादवनगर एक तर इचलकरंजीतील तीघांचा समावेश आहे.  

बावड्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू

दरम्यान, गेल्या चार दिवसापूर्वी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या बावड्यातील कोरोना रूग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल. गेल्या चार दिवसांपूर्वी लक्षणे दिसायला लागल्यानंतर त्यांन उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा अहवाल तपासला असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सांकाळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.  

‘ते’ डॉक्‍टर ठणठणीत
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ताराबाई पार्कातील डॉक्‍टरांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह इतर २५ जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT