कोल्हापूर : माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे आदेश काढले. त्यानंतर तीनेक दिवसांत तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर शिक्षकांची तपासणीसाठी झुंबड उडाली आहे. पाच हजार ७८६ शिक्षकांच्या तपासणीत आज तब्बल १७ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले. यात करवीरमधील एक, भुदरगड एक, शिरोळ चार, कागल चार, राधानगरी तालुक्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे.
कागल तालुक्यात चार पॉझिटिव्ह
कागल : येथे घेतलेल्या २०९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचणीत चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात १११४ शिक्षक व ५१८ शिक्षकेतर कर्मचारी असे १६३२ जण आहेत. त्यांचे स्वॅब तपासण्याचे नियोजन केले आहे. २०९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये कागलमध्ये राहणाऱ्या तीन शिक्षकांसह केंबळी येथील एक असे चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात एका शिक्षिकेचाही समावेश आहे. अद्याप १४०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांचे स्वॅब २३ ते ३० नोव्हेंबरअखेर घेतले जाणार आहेत.
शिरोळमध्ये तीन शिक्षकांसहशिपाई कोरोना पॉझिटिव्ह
जयसिंगपूर ः शिरोळ तालुक्यातील तीन शिक्षक आणि शिपाई पॉझिटिव्ह आढळले. शहरे आणि गावातील शाळांच्या शिक्षकांच्या तपासणीसाठी मौजे आगर येथे एकच स्वॅब तपासणी केंद्र असल्याने शिक्षकांची झुंबड उडाली आहे. वादावादीमुळे गुरुवारी काही काळ तपासणीचे कामही बंद करावे लागले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वॅब तपासणी केंद्रे सुरू करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.
मौजे आगर येथे एकाच केंद्रात तालुक्यातील शिक्षकांची तपासणी होत आहे. तपासणी करूनही दोन-दोन दिवस अहवाल येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. एकाच केंद्रावर तपासणी होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण असून शिक्षकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्राथमिक शाळांबाबत निर्णय झाला नसल्याने शिक्षकांचे स्वॅब तपासणीला अवधी आहे. तरीही प्रशासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना स्वॅब तपासणीचे आदेश दिल्याने गोंधळात भर पडली. गुरुवारी यातून केंद्रावर गोंधळ उडाला. यामुळे काही काळ तपासणी बंद ठेवावी लागली.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.