कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल २३ ने भर पडल्यानंतर आता आलेल्या अहवालानुसार आणखी दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता एक हजार ६१ झाली आहे.
आता पाॅझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये करवीर तालुक्यातील चार, हातकणंगले दोन, आजरा एक, इचलकरंजी एक, गडहिंग्लज एक तर शहरातील एकाचा समावेश आहे,
दरम्यान काल दिवसभरात नऊ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहे. त्यामुळे कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्य आता ७७८ झाली आहे. एकूण २५० बाधितांवर ‘सीपीआर’सह अन्य पाच शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मृत्यूचे सत्र सुरूच
रूग्ण वाढिबरोबर कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. काल इचलकरंजी येथील दोघांचा, तर भुदरगड तालुक्यातील एक, अशा तिघांचे दिवसभरात मृत्यू झाले. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
इचलकरंजी येथील ८१ वर्षांचा पुरुष, तर ७० वर्षांची भुदरगड येथील महिला या दोघांचाही मृत्यू येथील ‘सीपीआर’मध्ये झाला. इचलकरंजीतील अन्य एका वृद्धाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला.
काल बाधित आढळलेल्यांमध्ये कोल्हापूर शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर, तसेच वळिवडे येथील एका हॉटेल चालकाचा समावेश आहे.
दरम्यान, क्वारंटाईनपैकी ११३ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. उपचार घेणाऱ्यांपैकी एकूण आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील १२ शासकीय रुग्णालयांत झालेल्या आरोग्य तपासणीत ४८८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
इचलकरंजीत एका शिक्षण संस्था चालकासह दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात आजअखेर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, टाकवडे आणि साजणी येथे आज दोन बाधित आढळले. शहरातील बाधितांची संख्या आता ८७ झाली आहे.
हे पण वाचा - दहावी-बारावीचा निकाल कधी ? वाचा...
शहरातील पुजारी मळ्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला काल (ता. ७) त्रास होत होता. अत्यवस्थ अवस्थेत या व्यक्तीस आयजीएममध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. लक्षणे कोरोनासदृश असल्याने प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन या व्यक्तीवर योग्य ती खबरदारी घेऊनच अंत्यसंस्कार केले. या व्यक्तीचा अहवाल काल दुपारी पॉझिटिव्ह आला. शिक्षण क्षेत्रातील एक जुने व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंगोटे मळा येथील एका ७३ वर्षांच्या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते. काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोडगे मळा येथे पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे; तर दुसरा रुग्ण हा शहापूर येथील आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ८७ वर पोहोचली असून त्यातील २५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ५३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
टाकवडे धास्तावले
टाकवडे (ता. शिरोळ) येथील ६९ वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. ही व्यक्ती जनावरे बोडण्याचे काम इचलकरंजी परिसरात करत होती. या बाधित वृद्धाच्या तीव्र संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. त्यांना शिरोळ येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.