Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge esakal
कोल्हापूर

Kagal Politics : 'सासूसाठी भांडत बसलो अन् सासूच वाट्याला आली'; मुश्रीफांच्या भूमिकेमुळं समरजितांची मोठी कोंडी

या घडामोडीनंतर घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. ते मुंबईला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

भाजपने आणि विशेषतः फडणवीस यांनीही राज्याच्या राजकारणात घाटगे यांना मोठे महत्त्व दिले होते.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने कागलच्या राजकारणात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची कोंडी होणार आहे.

‘सासूसाठी भांडत बसलो आणि सासूच वाट्याला आली’ अशी घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांची अवस्था झाली आहे. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातून (Kagal Assembly Constituency) मुश्रीफ हे १९९९ पासून सलग पाचवेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले आहेत.

१९९९ मध्ये केवळ २८८१ मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर सातत्याने चढत्या मताधिक्यांनी विजयी होणाऱ्या मुश्रीफ यांच्यासमोर २०१९ पासून ‘शाहू’ ग्रुपचे प्रमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी चांगलेच आव्हान उभे केले होते.

२०१९ मध्ये भाजप- सेना युती होती. युतीत जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आले होते. त्यावेळी भाजपने आपले मतदारसंघ जाहीर करण्यापूर्वीच सेनेने आठही मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा करून भाजपला शह दिला होता. त्यात मुश्रीफ यांच्या अपेक्षेप्रमाणे सेनेने माजी आमदार संजय घाटगे यांना उमेदवारी दिली होती.

त्यावेळी बंडखोरी करून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून समरजितसिंह यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्या या बंडखोरीला त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बळ होते, असा आरोपही झाला होता. या निवडणुकीत घाटगे यांनी तब्बल ८८ हजार मते मिळवली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत घाटगे हेच मुश्रीफ यांचे प्रमुख विरोधक असतील असे चित्र होते. त्यातून भाजपने आणि विशेषतः फडणवीस यांनीही राज्याच्या राजकारणात घाटगे यांना मोठे महत्त्व दिले होते. साखर कारखाना, बँक आणि इतर संस्थात्मक पातळीवरही चांगले काम असल्याने घाटगे हे मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतील, असे चित्र होते.

पण, तत्पूर्वीच राज्याच्या राजकाणात घडलेल्या घडामोडीनंतर मुश्रीफ हेच भाजपसोबत सत्तेत सहभागी तर झालेच पण मंत्रीही झाल्याने या जोरावर ते पुन्हा कागल मतदारसंघात जोमाने काम करू शकतात. त्यातून घाटगे यांची मात्र मोठी कोंडी होणार आहे.

घाटगे नाराज असल्याची चर्चा

या घडामोडीनंतर घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. ते मुंबईला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याने घाटगे हेही नाराज असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT