नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी तयार केलेल्या कलमेश्वर विद्यालयातील अलगीकरण केंद्रावर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती व तरुणांच्या संकल्पनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून अलगीकरण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सोशल मीडियाची माहिती असलेल्या तीन तरुणांच्या मोबाईलवर कॅमेरे कनेक्ट केले आहेत. अलगीकरण कक्षातील नागरिकांना याची पूर्वकल्पना देऊन कोरोना संसर्ग बचावासाठी प्रयत्न सुरू आहे. कोणीही आपल्या नियोजित केलेल्या कक्ष अथवा जागे व्यतिरिक्त विनाकारण फिरू नये, अशा सूचना कोरोना दक्षता समितीने दिल्या आहेत.
कलमेश्वर विद्यालय, प्राथमिक शाळा, ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी अलगीकरण कक्ष केले आहेत. त्यांच्यावर कोराना दक्षता समितीद्ववारे नियंत्रण ठेवले जात आहे. अलगीकरण केंद्रातील नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी तीन कार्यकर्त्यांची नेमणूक करून सेवा पुरविल्या जातात.
तिघांच्या व्यतिरिक्त गावातील कोणत्याही नागरिकाला अलगीकरण कक्षा नजीक जाण्यास सक्त मनाई केली आहे. जेवण व्यवस्था पुरविताना योग्य ती काळजी घेतली जात असून फिजीकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाझर यांचे काटकोरापणे वापर केला जातो आहे. ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती सदस्य, अंगणवाडी, आशा, आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले जाते आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना तत्काळ सुविधा देण्यासाठी दक्षता समिती तत्परतेने काम करत आहे.
सरपंच प्रकाश गुरव, उपसरपंच तुकाराम कांबळे, पोलिसपाटील भाऊ पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संतोष पाटील, तलाठी शरद नाकाडे, ग्रामसेवक समाधान माने, माजी तंटामुक्त अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करीत आहेत.
केंद्रावर नियंत्रण ठेवण्यास मदत
गावकरी व मुंबईकर एकच असून कोणताही गैरसमज न करता कोरोनाच्या संकटातून सर्वांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अलगीकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत.
- संतोष पाटील, अध्यक्ष तंटामुक्त समिती सांबरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.