nrusinhwadi sakal
कोल्हापूर

नृसिंहवाडी होणार प्लास्टिकमुक्त

गांडूळ खत प्रकल्पासाठी २२ लाखांचा प्रस्ताव

जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी : येथील ग्रामपंचायतीने(nrusinhwadi grampanchayat) गावात वाढणाऱ्या प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी(Plastic waste disposal) अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रोज सुमारे दोन टन कचरा गोळा होतो. तीर्थक्षेत्रावर वाढत जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कुठे करायची, हा प्रश्न होता. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या प्रेरणेने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक कचरा निर्मूलनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यासाठी कचरा निर्मूलनासाठी शेड व गांडूळ खत (Vermicompost project)प्रकल्पासाठी प्रस्तावाअंती मदत मिळेल. ग्रामपंचायतीने यासाठी रीतसर प्रस्ताव शिरोळ गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. ग्रामपंचायत दिवसभरात दोन टप्प्यांमध्ये गावातील ओला, सुका, प्लास्टिक कचरा गोळा करतात. प्लास्टिक पिशव्या(plastic bags) वेगळ्या केल्या आहे. सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे व ग्रामसेवक बी. एन. टोणे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने ही मोहीम हाती घेतली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या पुढाकाराने आपण तीर्थक्षेत्र ग्रामपंचायतीला प्लास्टिक संकलन शेड व ओल्या कचऱ्यासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मितीसाठी मदत होईल. प्लास्टिक कचरा सिमेंट कंपनीला पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गाव स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

- प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

शिरोळ गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेला नूतन प्लास्टिक शेड व गांडूळ खत प्रकल्पासाठी २२ लाखांचा प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत. यामुळे ओला व सुक्‍या कचऱ्याचे खतात रूपांतर होईल व दुसऱ्या बाजूला खासगी कंपनीला कचऱ्याच्या स्वरूपातील प्लास्टिक पिशव्या पाठविल्यामुळे नृसिंहवाडी गाव प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होईल.

- रमेश मोरे, उपसरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT