onion imports have increased tremendously in the last eight days wholesale prices have also increased due to increased demand 
कोल्हापूर

कांद्याने आणले डोळ्यात पाणी : गाठली शंभरी , किरकोळ विक्री दुप्पट दराने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या आवकेत कमालीची वाढ असली तरी मागणीही वाढल्याने घाऊक दरात वाढ झाली. प्रथम श्रेणीचा कांदा सातशे रुपये, तर तिसऱ्या श्रेणीचा कांदा २५० रुपये प्रति दहा किलो, असा घाऊक दर आहे. या भाववाढीचा गैरलाभ उठवत किरकोळ विक्रेत्यांनी किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलो कांदा विकत ग्राहकांची लूट सुरू केली आहे. 


शाहू मार्केट यार्डात कांद्याची आवक दररोज ४० ते ५० गाड्या आहे. बहुतांशी कांदा पुणे, सोलापूर, नगर, सातारा ग्रामीण भागातून येतो. अन्य जिल्ह्यांतील कांद्याची भाववाढ झाली; मात्र पुणे, सोलापूर, औरंगाबाद बाजारपेठेच्या तुलनेत कोल्हापूर बाजारपेठेत कांद्याला भाव चांगले असल्याने बहुतांशी शेतकरी कांदा कोल्हापूर बाजारपेठेत आणत आहेत. यातून आवक, मागणी आणि दरही वाढले.


याबाबत घाऊक व्यापारी मनोहर चुघ म्हणाले, ‘‘गेल्या १५ दिवसांपूर्वी अन्य बाजारपेठेत कांद्याला भाव कमी होते, तर कोल्हापूर बाजारात ५० ते ६० रुपये किलोचा भाव मिळू लागला. त्याची दखल घेत अनेक शेतकऱ्यांनी कांदा कोल्हापूरला विक्रीसाठी आणला. अशातच सण तोंडावर आहेत. शेतकऱ्यांनाही खर्चाची तजवीज करावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी कांदा आणला. त्याने आवक वाढली. याच दरम्यान दक्षिण भारतात पावसाने कांदा उत्पादन घटवले तेथूनही कांदा आवक झालेली नाही. या उलट कोल्हापुरातून कांदा तामिळनाडू, केरळ, गोवा, कोकणकडे पाठवला जात आहे. लॉकडाउन संपल्याने कांद्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. कांद्याची दर वाढ जानेवारीपर्यंत टिकून राहील, असा अंदाज आहे.’’  


किरकोळ विक्री दुप्पट दराने
कोल्हापूर घाऊक बाजारात २५० ते ३५० रुपये प्रति दहा किलोचा कांदा खरेदी करून तो शहरातील विविध मंडईत किंवा दुकानात विक्रीस आणला जातो. मात्र, तेथे त्याचे दुप्पट दर लावून प्रति किलोसाठी ७० ते ८० रुपये दराने विक्री होत आहे. त्यातून ग्राहकांची लूट सुरू आहे. वास्तविक घाऊक बाजारपेठेत पहिल्या श्रेणीचा कांदा अवघा १५ टक्के आहे. त्याचे दर प्रति दहा किलोला ७०० रुपयांवर आहेत. उर्वरित कांदा तिसऱ्या व दुसऱ्या श्रेणीचा आहे. त्याचा दर पाचशे रुपयांच्या आतच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT