online teaching prayag chikhali kolhapur 
कोल्हापूर

संचारबंतीतही त्यांचे शिक्षण नाही थांबले ; शिक्षक घेताहेत ऑनलाईन वर्ग 

तानाजी मस्कर

प्रयाग चिखली (जि. कोल्हापूर)-  शाळेत नेहमी नवनविन उपक्रम राबविण्यात यशस्वी असणाऱ्या रजपुत वाडीच्या आश्रम शाळेत ऑनलाइन  मोबाईल शाळेचा उपक्रम उत्साहात सुरू आहे.

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच शाळेांना १६ मार्चपासून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील सर्वच मुले पालकांनी वसतीगृहातून घरी नेली आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये. यासाठी  माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील रजपूतवाडी येथील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्याला मुलांच्या अभ्यासाठी काय करता येईल यावर विचारविनियम केला. आपली  डिजीटल शाळा आहे. सर्व शिक्षकांनी ठरवले आपण शाळा ऑनलाईन सुरु ठेवायची. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले. वर्गशिक्षक पी. टी. भोसले , वाघमोडे, प्रदीप उबाळे. राधिका कुरणे-पाटील  यांनी नववी पास होऊन दहावीत प्रवेशित होणा-या सर्व मुलांच्या पालकांचे नंबर घेऊन व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला.  त्यात प्रत्येक विषय शिक्षकांना समाविष्ठ केले. सर्व पालकांना वैयक्तीक फोन करुन कळविण्यात आले. आपण मोबाईलद्वारे शाळेचा अभ्यासवर्ग चालू करणार आहोत. त्याची वेळ, त्याची सर्व पध्दती समजावून सांगण्यात आली. सर्व विषय शिक्षकांनी पुढील दिवसाच्या अभ्यासाचे, टाँपीकचे वर्गानुसार  लिखित नियोजन केले. २ एप्रिल पासून शाळा सुरू झाली. मोबाईल शाळा ग्रुपवर दैनदिन अभ्यास रोजच्या रोज सुरु झाला. आजचा काय अभ्यास आहे. ते मुलांपर्यंत पोहचवता येत आहे. मुले रोजच्या रोज नियमित दिलेला अभ्यास पूर्ण करत आहेत. त्यात सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातील. मुले आनंदाने अभ्यास करत आहेत. मुलांच्या अडचणी मुले मोबाईलवर सांगतील. त्या सगळ्या समस्या शिक्षक ऑनलाईन सोडवून देतील. व्हीडिओ काॅलिंगवरून गुगल अॅप, यु-टुब, गुगल लिंकद्वारे सर्व उपलब्ध संदर्भांचा वापर शिक्षक करत आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षक व मुले नियमित शिक्षण घेणे व देणे सोप होईल. मुलांचा राहीलेला अभ्यासपूर्ण करता येईल. सराव सुध्दा नियमित चालू राहील.  इंग्रजी, मराठी, हिंदी, विज्ञान, गणित, इतिहास, भुगोल  सर्वच विषयांचा अभ्यास घेतला जाईल. याचा मुलांना उपयोग होणार आहे. त्यामुळे मुलांच्या व पालकांच्या प्रतिक्रीया खूप चांगल्या आल्या आहेत.  काळानुरुप असे विदयार्थी हिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. असे मत संस्था कार्याध्यक्ष दलितमित्र मा. व्यंकाप्पा भोसले यांनी व्यक्त केले. या सुंदर व स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे कार्यवाह सुनिल भोसले  यांनी सर्व शिक्षकांना प्रोत्साहन दिले.


संचार बंदीच्या काळात हा आश्रमशाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम मुलांसाठी एक अनोखी संधी  संजीवनी ठरेल. मुलांना आनंद देणारा व अभ्यासातही उत्साह निर्माण करणारा आहे. घरी सुरक्षित राहून घरबसल्या शिक्षणात खंड पडू न देणारा व उपयुक्त असा हा शैक्षणिक उपक्रम आहे. असे मत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी कोरवी यांनी केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT