only five days the youth starts a covid center mangaon in kolhapur 
कोल्हापूर

तरुणाईच्या निर्धाराने उभारले पाच दिवसांत कोविड सेंटर

सदानंद पाटील

कोल्हापूर : बेड मिळत नसल्याने येणारे फोन, कोरोनाग्रस्तांची होणारी फरफट, होणारे मृत्यू यामुळे हेलावून गेलेल्या कार्यकर्त्यांनी गावातच कोविड केअर सेंटर उभा करण्याचा निर्धार केला. निर्धार करूनच ही तरुणाई थांबली नाही, तर अवघ्या पाच दिवसांत सुसज्ज कोविड सेंटर उभे केले. हातकणंगले तालुक्यातील मानगाव येथील तरुणाईने करून दाखवले आहे. रविवारी या कोविड सेंटरचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते होत आहे.

दररोजच कार्यकर्ते व ग्रामस्थांची होणारी फरफट पाहून माजी महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम व त्यांचे दीर राजू यांनी गावातच कोविड केअर सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला. याकामी वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करत हे कोविड सेंटर उभे केले.
कोविड सेंटरमध्ये लाईट फिटिंग व रंगरंगोटीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जवळपास ३० ते ४० कार्यकर्ते या सर्व कामात गुंतले होते. यानंतर हॉल स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले. एवढ्या रात्री स्वच्छतेसाठी कापड कोठून आणणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता सर्वच कार्यकर्त्यांनी अंगातील बनियन काढून त्याने स्वच्छता केली. 

कोविड सेंटरमधील सुविधा

५० बेडची व्यवस्था, १० ऑक्‍सिजन बेड, वाफ घेण्यासाठी २५ मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, प्रत्येक बेडसाठी ऑक्‍सिमीटर व थर्मलगन, गरज पडल्यास ईसीजी व्यवस्था, ऑक्‍सिजनयुक्‍त २४ तास ॲम्ब्युलन्स व्यवस्था, कोविड सेंटर व परिसरात सीसीटीव्ही, महिला व पुरुष स्वतंत्र वॉर्ड, डॉक्‍टरांसाठी वेगळ्या रुम्स, ४ शौचालये व बाथरुम, मनोरंजनासाठी साउंड सिस्टीम, बातम्या पाहण्यासाठी २ एलसीडी आहेत.

"दररोज चार ते पाच लोक बेड मिळत नसल्याची तक्रार करत होते. त्यांची सोय लावताना धावपळ उडत होती. वेळेत सोय होत नसल्याने रुग्णांचे प्राण जात होते. अजूनही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. त्यामुळे बेड मिळत नसल्याने कोणाचे प्राण जाऊ नयेत म्हणून मोठ्या हिंमतीने गावात कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला."

- राजू मगदूम, सामाजिक कार्यकर्ते

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT