The Only Remnants Of Chawadi In Jarali Village Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

'या' गावातील चावडीचे फक्त अवशेषच शिल्लक...

विठ्ठल चौगुले

नूल : गावचा महसूल, शेतसारा जमा करण्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरळी (ता. गडहिंग्लज) येथील सरकारी गावचावडीची इमारत नेस्तनाबूत झाली आहे. आता फक्त त्या जागेवर इमारतीचे अवशेष शिल्लक आहेत. शासनाच्या तिजोरीत दरवर्षी लाखोचा कर जमा करणाऱ्या गावचावडीला बेवारस होण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाने निधी उपलब्ध करून नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे. 

चार हजार लोकसंख्येच्या जरळीत आठशे हे हेक्‍टर जमीन आहे. खातेदारांची संख्याही बाराशेच्या आसपास आहे. महसुली उत्पन्नही चांगले आहे. शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या चावडीतून गावचा शेतसारासह इतर कर गोळा केले जातात. याच इमारतीत ग्रामपंचायत आणि पोलिसपाटील कार्यालयही होते. दरम्यान, गेल्या सात-आठ वर्षापासून इमारत पूर्ण मोडकळीस आली.

मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसात इमारतीचे छप्पर कोसळले. भिंती ढासळल्या आहेत. इमारतीचे लाकूड कुजले आहे. याच इमारतीच्या एका बाजूला पोष्ट कार्यालय, तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीचे कार्यालय कार्यरत होते. इमारतीच्या या अवस्थेमुळे ग्रामपंचायतीने नवीन इमारत बांधून त्यातच पोष्ट ऑफिसला जागा दिली आहे. परंतु, गावचावडी मात्र रस्त्यावर आली. ही परिस्थिती पाहून हिराशुगरचे माजी संचालक कै. जी. एल. पाटील यांनी आपल्या मालकीच्या एका घरात तलाठी कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली. तेथून स्थलांतरित होउन हे कार्यालय आता कुमार गुरव यांच्या घरी सुरू आहे. 

नव्या इमारतीची प्रतीक्षा... 
तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी चावडीसाठी मुख्य रस्त्यावर लक्ष्मी विहिरीनजीकची जागा सूचित केली. पाच वर्षापूर्वी प्रस्तावही तहसील कार्यालयाकडे दाखल केला. तत्कालीन तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला, पण आजअखेर शासन स्तरावरून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 

नवीन चावडीची इमारत उभी करावी
शंभर वर्षापूर्वीची ही इमारत आहे. आता ती पूर्णपणे कोसळली आहे. गाव चावडीला आता कोणी वाली नाही. शासनाच्या महसूल विभागाने निधी उपलब्ध करुन जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन चावडीची इमारत उभी करावी. 
- जी. व्ही. कुलकर्णी, माजी पोलिसपाटील, जरळी 

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT