Only those with symptoms will be swabbed 
कोल्हापूर

लक्षणे असणाऱ्यांचाच स्वॅब घेणार 

सुधाकर काशिद

कोल्हापूर : कोल्हापुरात परजिल्ह्यातून किंवा अन्य राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्याऐवजी ज्यांना लक्षणे आहेत, फक्त त्यांचाच स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहे.

सर्वांचेच स्वॅब तपासणीसाठी घेत असल्याने तपासणीसाठी होणारा विलंब, प्रलंबित स्वॅबची वाढती संख्या व त्यामुळे आवश्‍यक स्वॅब तपासणी अहवाल यांना होणारा उशीर या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय झाल्याचे समजते. 

याशिवाय ज्यांना लक्षणे नाहीत, पण ते रेड झोनमधून आले आहेत, त्यांना सक्तीचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. रेड झोनशिवाय इतर भागातून येणाऱ्यांना व कोणतेही लक्षण नसलेल्यांचे स्वॅब न घेता, त्यांना कोठे व कसे क्वारंटाईन करायचे, हे प्राभाग समिती किंवा ग्राम समिती ठरवणार आहे. सध्या रेड झोन किंवा अन्य राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब तपासणीसाठी घेतला जातो. ज्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला आहे त्याचा अहवाल येईपर्यंत म्हणजे किमान दोन दिवस त्याला क्वारंटाईन केले जाते. अहवाल येईपर्यंत त्यांना इतर पन्नास-साठ जणांच्या सहवासात राहावे लागते. अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याला होम क्वारंटाईन करून सोडले जाते. या प्रक्रियेत क्वारंटाईन हॉस्टेल हाऊसफुल्ल होतात. ज्यांना काहीही लक्षणे नाहीत, अशांनाही दोन दिवस अहवालाच्या चिंतेत हॉस्टेलमध्ये काढावे लागतात. याशिवाय स्वॅब तपासणी यंत्रणेवरचा तपासणीचा भार वाढतो. या पद्धतीतून प्रत्येकाचा स्वॅब तपासला जातो, हा चांगला भाग आहे; पण ज्यांना लक्षण नाही त्या प्रत्येकाचा स्वॅब घेणे आवश्‍यक नाही. 

क्वारंटाईन घरावर स्टिकर 
यापुढे होम क्वारंटाईन केल्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ज्या घरात क्वारंटाईन केलेली व्यक्ती आहे, त्या घरावर ठळक स्टिकर लावण्यात येणार आहे. या घरातील व्यक्ती बाहेर फिरू लागली तर ते इतरांच्या लक्षात यावे व इतरांनाही या घरात क्वारंटाईनच्या काळात जाणे टाळावे यासाठी ही खबरदारी घेतली आहे. 


स्वॅब कोणाचे घेणार 
जे परराज्यातून, रेड झोनमधून, पर जिल्ह्यातून आले आहेत; पण त्यांना ताप, सर्दी, खोकला, दम लागणे, थकवा येणे अशी लक्षणे आहेत. अन्य लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येईल. अर्थात त्यांना घरात ठेवायचे की, गावातील सार्वजनिक शाळा, हॉल, किंवा अन्य सोयिस्कर ठिकाणी ठेवायचे हा निर्णय प्रभाग समिती किंवा ग्राम समिती घेईल. 

रेड झोनमधून आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब घेतला जात होता. आता तसे न करता, ज्या लोकांना तीव्र लक्षणे दिसतात, त्यांची पहिल्यांदा चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर इतरांची चाचणी होईल. अशी टप्प्याटप्प्याने सर्वांची तपासणी घेतली जाईल. 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT