कोल्हापूर : केंद्र सरकारने अलीकडेच सुरू केलेली स्वामित्व ही ग्रामीण भागातील डिजिटल मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र सरकारची योजना असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या योजनेवर महाराष्ट्र सरकारने काम केलेले असून आतापर्यंत या योजनेवर ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. लवकरच ही योजना पूर्णत्वास येणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरण झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमधून हा वार्तालाप केला. पुणे जिल्ह्यातील कोंढणपूरच्या विश्वनाथ मुजुमले यांना मालकीहक्क पत्र प्रदान करण्यात आले. स्वागत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले.
भाजप नेते बिळातून बाहेर : मुश्रीफ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तब्बल सात महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक स्वागत, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
येथील विनायक गणपतराव गाताडे यांच्यावर पुण्यातील मंगेशकर इस्पितळात उपचार करून त्यांना बरे करून आणल्याबद्दल गाताडे परिवाराने मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. विनायक यांच्यासह केडीसीसी बॅंकेचे संचालक विलासराव गाताडे, कागलचे माजी नगराध्यक्ष सुरेशराव गाताडे व या परिवारातील सदस्यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला. रांगोळ्या काढून व फुलांचा वर्षाव करीत या परिवाराने श्री. मुश्रीफ यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.