Oxymeter 
कोल्हापूर

शरीरात नैसर्गिकरीत्या ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोनाने (Covid 19) हाहाकार माजवला असला तरीही यापासून बचाव करण्याचे अनेक नैसर्गिक उपाय आहेत. जीविताशी आवश्यक असणाऱ्या हवा, पाणी आणि अन्न जर शरीराला मिळणाऱ्या प्राणवायूचे संतुलन जर योग्य असेल तर कोणतीही व्याधी होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. शरीरातील प्राणवायू (oxygen)रक्तात मिसळून शरीरालाच जीवित ठेवण्याचे कार्य करतो. कोरोनाच्या या कालावधीत शरीरातील ऑक्सिजन लेव्हल योग्य राखणे महत्त्वाचे आहे. ही लेव्हल योग्य राखण्यासाठी काही नैसर्गिक उपाय. (oxygen-naturally-increase-the-body-ability-Five-important-tips-marathi-news)

शरीरातील ऑक्सिजन मोजण्याच्या पद्धती

शरीरामधील ऑक्सिजन लेव्हलची क्षमता मोजण्यासाठी दोन पद्धती आहेत. एबीजी म्हणजे धमनी, रक्तातील ऑक्सिजन तपासण्यासाठी जर या पद्धतीच्या वापराने शरीराची ऑक्सिजन पातळी तपासली असेल, तर त्याची साधारण पातळी ऐंशी ते शंभर (८०-१०० mmhg) मध्ये असावी. पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केल्यास यात आपली ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हलच कळते. याची साधारण पातळी ९५ ते १०० टक्के असणे आवश्यक आहे.

ऑक्सिजन लेव्हल म्हणजे काय?

सर्व प्रकारच्या जैविक क्रियांसाठी ऊर्जा निर्माण करण्यात शरीराला ऑक्सिजनची गरज भासते. या प्रक्रियेत कार्बनडाय ऑक्साईड रूपात शरीरातून बाहेर पडतो. यासाठी श्वसन यंत्रणा वातावरणातून हवा घेऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचवते आणि नंतर ऑक्सिजन दोन्ही फुफ्फुसे आणि कोशिकांच्या आत सोडते. फुफ्फुसांत हवेतून ऑक्सिजन घेऊन रक्त आणि कार्डियोवस्‍कुलर सिस्‍टीमद्वारे कोशिकांपर्यंत पोहोचवला जातो. ज्यामुळे ऊर्जा तयार होते. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि रक्तात मिसळतो. याप्रकारे ऑक्सिजन श्वास घेण्याचा प्रक्रियेसाठी गरजेचा असतो. तुम्ही श्वास कसा घेता, यावर तुमचे स्वास्थ्य अवलंबून असते.

शरीर सुदृढ असावे, ही प्रत्येकाची इच्छा असते, मात्र काही नैसर्गिक नियमांना डावलून येणारी सुदृढता अपायकारकही असू शकते. ताजी हवा, दीर्घ श्वास, अन्न आणि शुद्ध पाणी हे नैसर्गिकरीत्या अनेक व्याधींपासून बचाव करण्यास अधिक सक्षम आहेत. याचा योग्य वापर दिनचर्येत केल्यास निरोगी आयुष्य जगणे सुलभ होईल.

- प्रज्वला लाड, आहार तज्ज्ञ, मधुमेह सल्लागार.

आहार

रोजच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश असावा. फळांच्या रसापेक्षा फळ खाणे फायदेशीर ठरेल. विटामिन सी असणारे पदार्थ दिवसभरातून एकदा तरी खावेत. संत्रे, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू आदी. रोजच्या आहारात तेलाचे व मिठाचे प्रमाण कमी असावे. साखरेचं प्रमाणही कमी असावे.

झोप

मानवी शरीरासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन धावपळीत माणूस झोपेकडे कमी लक्ष देतो. यामुळे अनेक आजारांशी सामना करावा लागतो. रोज सात ते आठ तास झोप हवी. जर एखादी व्यक्ती एक दिवस नाही झोपली, तर त्याचा मेंदू चार दिवस नीट काम करू शकत नाही. जेव्हा शरीराची झोप पूर्ण होते, तेव्हा शरीर हे तंदुरुस्त होते. शरीरातील प्रतिकार क्षमता सुधारते.

खोल श्वास

सध्याच्या काळात श्वसनासंबंधीचा व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते. रोज सकाळी किमान १० ते १५ मिनिटे श्वसनाशी संबंधित व्यायाम करणे गरजेचे आहे. श्वास आत घेताना व सोडताना हळूवार सोडावा. श्वसन संबंधित व्यायामात उज्जाई प्राणायाम, कपालभाती, नाडी शोधन आदी आसनाचा वापर करावा.

पाणी

शुद्ध पाणी पिणे हे शरीराला महत्त्वाचे असते. दिवसभरातून दोन ते अडीच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यासोबत ताक, नारळपाणी, भाज्यांचा रस यांचाही समावेश द्रव पदार्थात करू शकता. जर शरीरातील पाण्याची पातळी उत्तम असेल, तर ऑक्सिजन लेव्हल सुरळीत होण्यास मदत होते.

ताजी हवा

रोज सकाळी उठल्यानंतर १० ते १५ मिनिटे ताज्या हवेत बसने फायदेशीर ठरेल. घराच्या बाल्कनीत बसणे किंवा खिडकीजवळ उभारणे किंवा टेरेसवर फिरणे आदी गोष्टी नियमांच्या अधीन राहून करू शकता.

oxygen-naturally-increase-the-body-ability-Five-important-tips-marathi-news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT