कोल्हापूर

पन्हाळ्याला रस्ता नाही, मग कार्यालये हलवूया! अनेकांचा उपद्व्याप

काही जणांचा वाघबीळवर कार्यालये नेण्याचा घाट; गडावरील मूळ रहिवाशांत संताप

आनंद जगताप

पन्हाळा : पन्हाळगड खचतोय, लोकांना ये-जा करण्यास अडचण होते, मग इथली सर्व शासकीय कार्यालये वाघबीळवर नेऊ या, असा घाट काही लोकांनी घातला आहे. हे लोक पन्हाळगडाचे मूळचे रहिवासी नाहीत, गडावर येऊन त्यांनी कमवून स्वतः च्या मिळकती केल्या आहेत आणि हेच लोक स्वार्थासाठी कार्यालये हलविण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.

पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे, इथे छत्रपती ताराराणींची राजधानी होती. करवीर संस्थानचा कारभार इथून चालत होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे वास्तव्य होते. शाहू महाराजांची ये-जा होती. त्यांनीच राजवाड्यासमोर शिवमंदिर उभारले. थंड हवेचे ठिकाण म्हणून कै. यशवंतराव चव्हाण यांनी गडावर क वर्ग नगरपरिषद दिली. पूर्वी गडाला महालाचा दर्जा होता. आता तालुक्याचा दर्जा मिळाल्याने सर्व शासकीय कार्यालये चालू झाली आहेत. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्वतः ची इमारत आहे.

अलीकडे जुन्या इमारतीशेजारी नवीन इमारत बांधली आहे आणि एका इमारतीसाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याचे समजते. प्रांत कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन स्वमालकीच्या इमारतीत आहेत. पोष्ट कार्यालयाने जागा घेतली असून, बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कसे असताना काही मूठभर लोकांनी इथून कार्यालये हलवण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे.

याबाबत पन्हाळवासीयांत असंतोष पसरला असून, या लोकांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ते एकत्र आले आहेत. चार दरवाजातील रस्त्याचे दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर चालू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पडलेला भराव जेसीबीद्वारे दूर करण्याचे काम चालू केले आहे. खडकांची खोलीही ड्रिलिंग मशिनद्वारे तपासली जात आहे. पावसाने साथ दिल्यास आठवडाभरात दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांसाठी रस्ता सुरू होण्याची शक्यता आहे.

"काहीही झाले तरी पन्हाळ्यावरील कार्यालये हलविण्यात येणार नाहीत. यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांना साकडे घालू, प्रसंगी लोक आंदोलन उभारू.खचलेल्या रस्त्याचे काम वेगाने चालू आहे. आठवडाभरात नागरिकांसह, पक्षकारांची रस्त्याची सोय होईल."

- रूपाली धडेल, नगराध्यक्षा

"तालुक्यातील लोकांची सोय व्हावी आणि पन्हाळ्याला यायला रस्ता नाही म्हणून तात्पुरती काही कार्यालयाचे कामकाज वाघबीळ अगर अन्य ठिकाणी चालू करावे, रस्ता चालू झाला की कार्यालये पन्हाळ्यावर कायमस्वरूपी चालू करावी एवढेच माझे म्हणणे आहे. पन्हाळ्याशिवाय कार्यालयांना शोभा नाही."

- शिवाजी मोरे, जिल्हा परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT