कोल्हापूर

पन्हाळागडाची 'नव्या वाटेवरील' भ्रमंती

रस्ता खचल्याने ट्रेक करण्याची नवी संधी; स्थानिकांना हवी आहे उभारी

आनंद जगताप

पन्हाळा : निसर्गरम्य वातावरण न्याहाळाचयं...पाऊस, धुक्याचा आस्वाद घ्यायचाय? थोडेफार चालत पन्हाळगडाचं अंतरंग जाणून घ्यायचंय? तुम्हाला मनसोक्त आनंद द्यायला, कोरोनाने बेचैन झालेल्या तुमच्या मनाला उभारी द्यायला, मनातील नैराश्याचे ढग दूर करायला. आम्ही वाट पहातोय. मग या... जणू अशी सादच पन्हाळागडाचा परिसर घालत आहे.

पहिल्यांदा कोरोनामुळे आणि आता पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचल्याने पन्हाळागड शांत शांत आहे. निसर्ग नटून बसलाय..ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. क्षणात पाऊस.. क्षणात उन्हं .. क्षणात धुके असे आल्हाददायक वातावरण बनलयं. मुख्य रस्ता खचला असला तरी साधारण ५० ते ६० फुटांची पायवाट आहे. तुम्ही एकच करायचं. गडाच्या पायथ्याशी बुधवार पेठ पर्यंत दुचाकी, चारचाकी अगर बसने यायचे. वाहने बुधवार पेठेतच उभी करायची आणि साधारण एक किलोमीटर चालत, गाणी गुणगुणत, डोंगर दरी पहात, पक्षांचा मंजुळ आवाज ऐकत, गडाची तटबंदी न्याहाळत, नाक्यापर्यंत यायचं. तिथे तुम्हाला चार दरवाजाच्या पायाचे, मुजलेल्या बुरुजाचे, अंतर्गत पाणी वाहून नेणाऱ्या दगडी मोऱ्यांचे दर्शन घडेल आणि पन्हाळागड येथूनच चालू होतोय याची जाणीव होईल.

चालून थकला असाल तर नाक्यावर तुम्हाला चहापाणी, नाष्टा मिळेल, गड फिरायला रिक्षा, लंडन बस, मिनी रेल्वे, मिनी मोटरसायकल, सायकल, अगर चारचाकी वाहन मिळेल. गाईड मिळतील. या वाहनांतून फिरत अगर चालत गडावर फिरण्याचा आनंद घ्या. भूक लागली असेल तर झुणका भाकर, दही-खर्डा भाकरी, अगर ऑर्डर देऊन शाकाहारी, मांसाहारी जेवणाची चव घ्या. कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटक नसल्याने येथील छोट्या-छोट्या व्यावसायिकांची, वाहनधारकांची उपासमार चाललीय.

तुम्ही आलात तर तुम्हीही आनंदित व्हाल आणि या व्यावसायिकांचेही थोडेफार पोट भरेल. पण लक्षात घ्या, इथे येऊन दंगा करायचा नाही, निसर्गाला दुखवायचे नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरायचाच. अंतर ठेवून फिरायचे आणि सायंकाळी नाक्यावरून परत चालत बुधवार पेठपर्यंत जायचे. थोड्या दिवसात तुम्हाला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. तोपर्यंत थोडेसे चाला. आयता व्यायामही होईल आणि गडाचे खरेखुरे दर्शनही होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT