patient died because not available to bed in kolhapur 
कोल्हापूर

'पाच तासाची झुंज अयशस्वी ; आमच्या डोळ्यादेखतच त्याने सोडले प्राण' 

सदानंद पाटील

कोल्हापूर - कळंबा येथील कात्यायनी अपार्टमेंटमध्ये एक रुग्ण अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही धावत तिथे पोहोचलो. दोन दिवस ताप आल्याने रुग्ण अस्वस्थ होता. पीपीई कीट घालून शेजारी-पाजाऱ्यांच्या मदतीने रुग्णाला ऍम्ब्युलन्समध्ये घालण्यात आले. गाडी थेट आयसोलेशन येथे नेण्यात आली. डॉक्‍टरांनी बेड नसल्याचे सांगितले. यानंतर सीपीआर, मेडीकल कॉलेज असा प्रवास झाला. शहरातील बहुतांश रुग्णालयात बेड मिळाले नाहीत. अखेर थकूनभागून सीपीआर येथे पोहोचेपर्यंत आमच्या डोळ्यादेखतच रुग्णाचा मृत्यू झाला. असे सांगतच आशा कर्मचारी ज्योती तावरे यांचे आश्रू वहायला लागले. असे दररोज किती लोक आपला जीव गमावत आहेत. यावर काही होणार की नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

ज्योती तावरे म्हणाल्या, गेली पाच महिने आम्ही कोवीडीचे काम करत आहोत. रात्री,अपरात्री फोन येतात, रुग्ण अत्यवस्थ आहे, काहीतरी करा, मात्र आम्ही तरी काय करणार... आम्हालाही मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो त्या ठिकाणचा सर्व्हे करणे, संबंधित कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब घेणे, तसेच त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्याचे काम आम्ही करतो. मात्र काही वेळा माणुसकी म्हणून या रुग्णांना हॉस्पीटलमध्येही नेण्याची जबाबदारी पार पाडतो. 

दोनच दिवसापूर्वी सकाळी दहा वाजताच कात्यायनी अपार्टमेंटमध्ये एक रुग्ण अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. या रुग्णाला ताप व अशक्‍तपणा आला होता. त्यामुळे आम्ही धावतच पोहोचलो. संबंधित रुग्णाची तब्येत खालवत असल्याने हॉस्पीटलमध्ये दाखल करणे आवश्‍यक होते. मात्र पीपीई कीट चढवून पुढे कोणी येईना. शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णास ऍम्ब्युलन्समध्ये घालण्यात आले. तेथून पुढे सुरु झाला धक्‍क्‍यांचा प्रवास. आयसोलेशन, सीपीआरपासून सर्व मोठमोठी हॉस्पीटल पालथी घालूनही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर संबंधित रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले.

शेवटच्या क्षणी कुटुंबाची भेटही झाली नाही. असे अनुभव दररोज कितीतरी रुग्णांबाबत येत आहेत. त्यामुळे ऑक्‍सीजन बेड रिक्‍त असलेली माहिती प्रशासनासह आशा कर्मचाऱ्यांना मिळावी, म्हणजे रुग्णाला वेळेत उपचार करण्याचा सल्ला देता येईल, असे ज्योती तावरे यांनी सांगितले. 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT