police help to pregnant women in khanapur belgaum 
कोल्हापूर

पोलिसांनाही मन असतेच ना भाऊ ! त्या गरोदर माऊलीला नेले रुग्णालयात...

चेतन लक्‍केबैलकर

खानापूर - लॉकडाउनच्या काळात सर्वात जास्त ताण कुणावर असेल तर तो पोलिसांवर. केवळ बंदोबस्तच नाही तर जनजागृतीच्या कामातदेखील पोलिस मोलाचे योगदान देत आहेत. यादरम्यान, त्यांना निष्कारण फिरणाऱ्यांवर लाठीही उगारावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच पोलिसांबद्दल सर्वसामान्यांत रोष असल्याचे दिसते. पण, आम्ही करतो ते तुमच्यासाठीच असा त्यांची भावना आहे. त्याची झलक खानापुरात पहायला मिळाली.

त्याचे असे झाले, सध्या पोलिस खात्याकडून दररोज सहा गावांत पथसंचलन आणि जागृती फेरींचे आयोजन केले जात आहे. कुप्पटगिरी येथे पथसंचलन सुरू असतांना तेथील रेणुका यल्लाप्पा बेळवटकर या गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. ती महिला वेदनेने विव्हळत होती. गावात वाहन उपलब्ध नव्हते. रुग्णवाहिकेला फोन केला मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सवर रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या. ही माहिती पथसंचलनाचे नेतृत्व करणारे पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांना मिळाली. त्यांनीही रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केला, पण रुग्णवाहिका येण्यास जास्त वेळ लागेल, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.

बसगौडा पाटील यांनी पथसंचलन सुरू ठेवण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. गरोदर महिलेला आपल्या वाहनात घातले आणि रुग्णालय गाठले. त्यांनी रुग्णालयात त्या महिलेला दाखल करून तिची काळजी घेण्याची सूचना डॉक्टरांना करून पुन्हा पथसंचलनात सहभागी झाले. पथसंचलनाची जबाबदारी असतांनाही त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नागरीकही आवाक् झाले. पोलिसांच्या कार्याचे सर्वत्रच सध्या कौतूक होत आहे. त्यांच्या लाठीप्रसादाने धन्य झालेल्यांमध्ये त्यांच्याबद्दल रोषही आहे. पण, अशा घटनांतून पोलिसांचे कार्यकर्तृत्व अधिकच उजळून निघत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होतांना दिसते.

याबाबत सकाळशी बोलतांना पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील म्हणाले,  पोलिसांची ड्यूटी म्हणजे वेगळे काय असते. लोकांचा जीव वाचविण्याला आम्ही प्राधान्य देतो. लोकांना कोरोनापासून दूर ठेवून त्यांचा जीव वाचविण्यासाठी पथसंचलन करीत आहोत. गरोदर महिला रुग्णालयात पोहचू शकली नसती आणि काही अनाहूत घडले असते तर या सगळ्या सोपस्कारांना काहीच अर्थ राहिला नसता. जीव वाचविणे हाच हेतू आहे, शिवाय पोलिसांनाही मन असतेच ना भाऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT