political changes in kagal kolhapur sanjay ghatge and hasan mushrif in kolahpur 
कोल्हापूर

'साहेब, तुमच्या उलटा नाही तर शिलेदार म्हणून काम करू'

सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे (कोल्हापूर) : पंधरा दिवसांपूर्वी माझे वडील माजी आमदार संजय घाटगे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असली तरी राजकारणातच राहणार आहे; पण मुश्रीफसाहेब, तुमच्या उलटा नाही, तुमचा शिलेदार म्हणून काम करू, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने कागलच्या नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते. 

संजय घाटगे यांनी उभारलेल्या केनवडे (ता. कागल) येथील अन्नपूर्णा शुगर्स लिमिटेडच्या चाचणी गळीत हंगामाचा प्रारंभ आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमात अंबरिश यांनी प्रास्ताविकात राजकारणात सक्रिय राहताना श्री. मुश्रीफ यांच्या उलटा न जाता त्यांचा शिलेदार म्हणून काम करण्याची घोषणा करत कागलच्या राजकारणात वेगळ्या समीकरणाची बीजे रोवली.

यावेळी संजय घाटगे यांनी या कारखाना उभारणीतील योगदानाबद्दल श्री. मुश्रीफ यांचे जाहीर आभार मानले. ते म्हणाले, 'साखर कारखानदारी अडचणीत असतानाही मंत्री मुश्रीफ यांनी पुढे होऊन सांगितले, की  जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला कर्जपुरवठा करू. मी व मुश्रीफ हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकाचे मित्र आहोत. अल्पसंख्याक समाजात जन्मूनही बहुजनांची सेवा करण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.' मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'आम्ही दोघांनीही स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक जीवनाची सुरुवात केली. १९८५ ला आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. ३५ वर्षे दोघांनीही टोकाचा संघर्ष केला; परंतु दोघांनीही एकमेकांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला नाही.' 

मी निवृत्त होऊ देणार नाही

पंधरवड्यापूर्वी घाटगे यांनी जाहीर केलेल्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेचा संदर्भ घेत मुश्रीफ म्हणाले, ‘‘संजयबाबा, कागल तालुक्‍यासह कोल्हापूरच्या समाजजीवनात तुमच्यासारख्या निःस्पृह व लढवय्या नेतृत्वाची गरज आहे. मी तुम्हाला कधीच निवृत्त होऊ देणार नाही.’’ श्री. मुश्रीफ यांच्या या वाक्‍यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

त्या पराभवांचे दुःख नाही

संजय घाटगे म्हणाले, ‘‘मी आणि हसन मुश्रीफ आतापर्यंत सहावेळा एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलो. पहिल्या निवडणुकीतील विजय वगळता पुढे सलग पाचवेळा माझा पराभव झाला; परंतु हे पाचही पराभव मुश्रीफांसारख्या कर्तबगार विरोधकाकडून झाल्यामुळे आजअखेर मला त्याचे कधीच दुःखही झाले नाही.’’

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT