Ravikant Tupkar vs Raju Shetti esakal
कोल्हापूर

Ravikant Tupkar : तेच तेच म्हणणे कितीवेळा मांडू? तुपकरांचा राजू शेट्टींना उद्विग्न सवाल; दहा पानांच्या पत्रातून भूमिका जाहीर

पत्रात तुपकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि व्यथा नमूद केल्या.

सकाळ डिजिटल टीम

शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडू?

जयसिंगपूर : चार-पाच वर्षांपासून मनातील खदखद व्यक्त करत आलो आहे. शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांकडेही सातत्याने भावना व्यक्त केल्या. कितीवेळा तेच तेच म्हणणे मांडू, असा उद्विग्न सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले.

संघटनेच्या शिस्तपालन समितीने १५ ऑगस्टपर्यंत समितीसमोर उपस्थित राहून म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली होती. तुपकर समितीसमोर प्रत्यक्ष हजर झाले नसले तरी अध्यक्ष शेट्टी (Raju Shetti) यांना त्यांनी सविस्तर पत्र लिहिले आहे.

तुपकर यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की शेट्टी यांना आपण चार-पाच वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलो आहे. शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडू?

प्रत्येक निवडणुकीत शेट्टी यांची बदलती राजकीय भूमिका आणि त्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला परिणाम, संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यांसह इतर बाबी पत्रात नमूद केल्या आहेत. नऊ-दहा पानांच्या पत्रात तुपकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि व्यथा नमूद केल्या आहेत.

रविकांत तुपकर यांनी समोर यावे आणि चर्चा करावी. शिवाय तुपकर यांनी दिलेल्या पत्रावर माझे म्हणणे १९ तारखेपर्यंत शिस्तपालन समितीकडे पाठवणार आहे. दोघांचे पत्र समोरासमोर बघून शिस्तपालन समिती निर्णय घेईल.

-राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT