कळणे: ऐन गणेशोत्सवात सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाने कळणे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भरमसाठ वीज बिलांची वसुली करणाऱ्या वीज वितरण कंपनीला ऐन गणेशोत्सवात देखील वीज पुरवठा सुरळीत ठेवता आलेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला विजेचा खेळखंडोबा गणपतीच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे. यावेळी गणेशभक्तांची गैरसोय होऊन उत्साहवर विरजण पडू नये म्हणून, अत्यावश्यक सेवा विनखंडीत सुरु असणे अपेक्षित असते. मात्र तालुक्यातील सासोली वीज उपकेंद्रतर्गत असलेल्या गावांतील ग्राहक गेल्या आठ गेल्या आठ दिवसांपासून सासोली वीज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या कळणे, आडाळी, मोरगाव सह कोलझर परिसरातील गावातील वीज वारंवार गायब झाली. ऐन गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु असताना विजेच्या या लपंडावाने ग्राहक हैराण झाले आहेत.
11 केव्ही क्षमतेच्या वाहिनीतील सततच्या बिघडामुळे वीज पुरवठा अनियमित आहे. त्यात कहर म्हणजे आज रात्रीही अनेक ठिकाणी वीज गायब झाली. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीसाठी गावातील वायरमन अडकल्याने गावातील किरकोळ दुरुस्ती राखडल्याने ग्राहकांना मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. गणेशमूर्ती शाळा, दुकाने आदीमध्ये गैरसोय झाली.त्यामुळे गणपतीच्या आगमनाच्या तयारीत अडथळे येत होते. सुरवातीला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित देखभाल दुरुस्ती असेल असा ग्राहकांचा समज होता.
मात्र गणपतीच्या आदल्या रात्री देखील रात्रभर वीज अनेकदा खंडित झाली. कहर म्हणजे आज गणपतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच वीज गायब झाली. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र पुन्हा दुपारनंतर खेळखंडोबा सुरु झाला. वीज नसल्याने गणेशभक्तांची गैरसोय झाली. अनेक घरगुती धार्मिक कार्यक्रमात अडथळे आले. त्यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले.
एरव्ही भरमसाठ वीजबिलांची आकारणी करण्यासाठी वसुलीच्या कारवाया करणारे वीज कंपनीचे अधिकारी मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहेत. ऐन गणपतीच्या काळात विजेचा खेळखंडोबा होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विजेच्या लपंडाव सुरुच राहिल्याने संताप व्यक्त होत आहे.
अधिकारी, लोकप्रतिनिधी कुठं आहेत?
तालुक्यातील बांदा-दोडामार्ग, दोडामार्ग-तिलारी रस्त्याच्या दुरावस्थेवरून जनता संतप्त आहे. गणपतीच्या काळात देखील खड्डेमय रस्त्यावरून मार्ग काढत जनता जीव मुठीत धरून प्रवास करतेय. त्यातच आता वीजेच्या खेळखंदोब्याने जनता त्रस्त झाली. एरव्ही सण -उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेचे आढावे घेणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र या समस्येवर जनतेचे समाधान करू शकले नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.