Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Ichalkaranji Sabha esakal
कोल्हापूर

देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व्हावी, अशी ‘वंचित’ची आमची भावना आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीची लोकसभेसाठी गट्टी जमली नसताना आम्हाला जागा किती हव्या, असे विचारत आहेत. १५ जागांवरून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भांडणात जागांचा ताळमेळ बसेना झाला आहे.

इचलकरंजी : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व्हावी, अशी ‘वंचित’ची आमची भावना आहे. मात्र, यात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी येथे केला. येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मैदानात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय न्याय हक्क निर्धार विराट सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, राज्यउपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, सर्वजित बनसोडे, अनिल जाधव, डॉ. क्रांती सावंत, प्रा. किसन चव्हाण, पुंडलिक कांबळे, प्रवक्ते गोविंद दळवी, फारूक अहमद होते. ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेस व भाजपवर जोरदार टीका केली.

आंबेडकर म्हणाले, ‘‘भाजप (BJP) लुटारू सरकार आहे, तर काँग्रेस (Congress) भुरटे चोर आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत देशावरील कर्ज २४ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत नेले आहे. अशा कर्जात मोदी देशाला कायमचे बुडवून एक दिवस संन्यासाला जातील. त्यामुळे देश बुडवणाऱ्या बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी नाही. ईडीची चौकशी लागते म्हणून भाजपविरोधात भूमिका घेत नाहीत. काँग्रेसमधील घराणेशाहीचा फायदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेत आहेत. देश अजून तुटलेला नसून जुळलेला आहे. तरीदेखील ‘देश बचाओ’सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहेत. एकीकडे बिघाड करत राज्यातील बडे काँग्रेसचे नेते सुपारी बहाद्दर झाले आहेत. अशा सुपारी बहाद्दरांना वेळीच आवर घातला नाही, तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील.”

ते म्हणाले, इचलकरंजी वस्त्रनगरीची ओळख अलीकडे दंगलीचे शहर म्हणून झाली आहे. धर्म धोक्यात आहे, त्याला भाजप वाचवणार, असे सांगत धर्माच्या नावाखाली गैरप्रकार, गैरप्रचार सुरू आहेत. यापुढे सावधानतेने पावले टाकावी लागणार आहेत. संविधान संपले तर निवडणुका संपतील आणि बीजेपी सत्तेवर आले तर आरक्षण संपणार आहे. नद्यांची मालकी ही राज्याची मालकी नको तर केंद्राची मालकी हवी. नियोजनाचा अभाव असल्यामुळे इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी नाही. देशाची वाट लावणारे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, ही जबाबदारी उचलली पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी सभेला केले.

भांडणं तुमची, खापर आमच्यावर

महाविकास आघाडीची लोकसभेसाठी गट्टी जमली नसताना आम्हाला जागा किती हव्या, असे विचारत आहेत. १५ जागांवरून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भांडणात जागांचा ताळमेळ बसेना झाला आहे. एकमेकांसोबत भांडणारी महाविकास आघाडी याचे आमच्यावर खापर फोडत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.

हातकणंगले मतदार संघाचे मांडले गणित

२०१९ च्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला एक लाख ३० हजारांपर्यंत मते पडली होती. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने पाच मते जोडा. अलुतेदार, बलुतेदार, गरीब, वंचित वर्गाशी संवाद साधा. यातून २०१९ च्या पाचपट मतदान झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून सहज खासदार होईल आहे, असे सांगत आंबेडकर यांनी हातकणंगले मतदारसंघाचे २०२४ च्या विजयाचे गणितच मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT