Road Accident esakal
कोल्हापूर

हृदयद्रावक! पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात सात महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार; डोक्यावरून गेले कंटेनरचे चाक

Pune Banglore Highway Accident : नियमित तपासणीसाठी ही महिला पतीसोबत मोटारसायकलवरून कागलला जात होती.

सकाळ डिजिटल टीम

कागल येथील सीमा तपासणी नाक्यासमोर कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने खोत यांच्या मोटारसायकलला जोरात ठोकरले.

कोगनोळी/कागल : भरधाव मोटारीने मोटारसायकलला (Road Accident) पाठीमागून ठोकरल्याने सात महिन्यांची गर्भवती कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाली. सुशीला ऊर्फ श्वेता रवींद्र खोत (वय २६, रा. हणबरवाडी- कोगनोळी, ता. निपाणी) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांचे पतीही जखमी झाले आहेत.

नियमित तपासणीसाठी ही महिला पतीसोबत मोटारसायकलवरून कागलला जात होती. त्यावेळी पुणे-बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) येथील उपप्रादेशिक परिवहनच्या येथील सीमा तपासणी नाक्यासमोर मंगळवारी दुपारी तीनच्यादरम्यान अपघात झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हणबरवाडी कोगनोळी (ता. निपाणी) येथील रवींद्र बाळासाहेब खोत (वय ३०), पत्नी सुशीला व मुलगा विराज यांना घेऊन मोटारसायकलीवरून कागलला चालले होते. कागल येथील सीमा तपासणी नाक्यासमोर कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने खोत यांच्या मोटारसायकलला जोरात ठोकरले. या धडकेत सुशीला गाडीवरून खाली पडल्या आणि कंटेरनखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे पाठीमागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर रवींद्र आणि मुलगा विराज काही अंतरावर जाऊन रस्त्यावर पडले. त्यांची मोटारसायकल सुमारे ७० ते ८० फूट पुढे जाऊन रस्त्यावर पडली. अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी (Kagal Police) घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविली. पंचनामा करून सुशीला यांचा मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सुशीला उर्फ श्वेता यांचे माहेर चिक्कोडी आहे. कागल पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

चालक मोटारीसह पसार

अपघातानंतर कंटेनर आणि चालक पळून गेला. आरटीओ तपासणी नाक्यातील काही कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून कंटेनरला पकडले; मात्र मोटारचालक मोटारीसह पळून गेला. कागल पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दोनवर्षीय मुलगा गंभीर जखमी

अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती; मात्र सुमारे अर्धा तास खोत यांना कोणीही मदत केली नाही. यावेळी कोगनोळीहून कागलला आपल्या घरी चाललेल्या रोहन कांबळे याने एका मोटारसायकलस्वाराच्या मदतीने जखमी रवींद्र खोत आणि त्यांचा मुलगा विराज यांना कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर विराजला कागल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात विराजचा डावा पाय मांडीतून मोडला आहे. रवींद्र खोत किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT