protest of jaysingpur municipality 
कोल्हापूर

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच भिरकावली तंबाखू 

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : शहरातील झेले कॉलनी मादनाईक मळ्यातील तंबाखू उद्योग बंद करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. मात्र, पूर्वकल्पना देऊनही मुख्याधिकारी टिना गवळी आपल्या दालनात अनुपस्थित राहिल्या. यामुळे आणखीनच संतापलेल्या महिला आणि पुरुषांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच तंबाखू फेकून निषेध नोंदविला.

दरम्यान, आंदोलकांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतप्त नागरीकांनी आमच्याबरोबर तंबाखू उद्योजकांवरही गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. दरम्यान, सोमवारपर्यंत कार्यवाहीचे आश्‍वासन उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी दिले. यानंतर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला. 

झेले कॉलनी मादनाईक मळ्यात सात ठिकाणी तंबाखूवर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रश्‍नी पालिकेने कारवाई करुन हे उद्योग बंद करावेत अशी मागणी नागरिकांनी नऊ जानेवारी रोजी पालिकेकडे केली होती. मात्र तरीही पालिकेने यावर काहीच निर्णय घेतला नसल्याने संतप्त महिला आणि पुरुषांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला. 

आंदोलक सामाजिक कार्यकर्ते सागर मादनाईक म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करत आहोत. तंबाखूमुळे किती त्रास होतो याची जाणीव करुन देण्यासाठी तंबाखू मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणली होती. मात्र, त्या आपल्या दालनात अनुपस्थित होत्या. आम्ही त्यांना आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. त्यांनी आमच्या मागणीकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे होते. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आल्यानंतर उपमुख्याधिकारी निवेदन घेण्यासाठी आले. नऊ जानेवारीलाही असेच झाले. त्यामुळे मुख्याधिकारी टिना गवळी आल्याशिवाय आम्ही इथून हालणार नसल्याची भूमिका घेतली. 

यात बरोबर आणलेली तंबाखू मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर पडली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर तंबाखू उद्योग चालविणाऱ्यांकडे आजवर का दुर्लक्ष केले असा सवाल व्यक्त करुन श्री मादनाईक म्हणाले, सोमवारपर्यंत आम्ही पालिकेच्या कारवाईची वाट पहाणार आहोत. यानंतर आम्ही तीव्र आंदोलनाची तयारी केली आहे. नगरसेवक बजरंग खामकर यांनी आंदोलक आणि प्रशासनात मध्यस्थीची भूमिका पार पाडली. 
अभय भिलवडे, प्रेमजीत पाटील, लोहिकांत खोत, आदिनाथ मादनाईक, अमित मगदूम, नेमिनाथ मादनाईक, रत्नदिप चौगुले, ज्योतेश कोथळे, वृषभ मादनाईक, अक्षय मादनाईक, दादासो पाटील, संजय साजणे, हरिश्‍चंद्र मादनाईक, प्रियांका पाटील, शुभांगी खोत, सरोजिनी पाटील, सुरेखा आवटी, कमल मादनाईक, संजीवनी खोत, त्रिशला मादनाईक यांच्यासह नागरीक आंदोलनात सहभागी झाले. 

मुख्याधिकारी टिना गवळी यांनी आंदोलकांना टाळण्याचा प्रयत्न केला आहे. पालिकेत येत असल्याचे मोबाईलवरुन सातत्याने सांगितले. अडीच तास थांबूनही त्या आल्या नाहीत. ज्यांच्याकडून न्यायाची मागणी करायची त्यांनीच आंदोलकांना झुलवत ठेवले. आंदोलनाकडे त्यांनी पाठ फिरवली असून याप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 

- सागर मादनाईक (सामाजिक कार्यकर्ते) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: १८ वर्षीय खेळाडूसाठी मुंबईचा हट्ट; मराठमोळा तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सकडे

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT