sangli sakal
कोल्हापूर

'करेक्ट कार्यक्रमाची ज्यांना आवड आहे, त्यांना सांस्कृतिक मंत्री करा'

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कृष्णा नदीच्या महापुराचे संकट संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. सांगलीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच शंका वाटते. त्यामुळे जलसंपदा खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घ्यावे. जयंतरावांना करेक्ट कार्यक्रम करण्याची आवड आहे. त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री करावे, अशी उपरोधिक टीका सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज केली.

येथील कृष्णा नदीकाठी टिळक चौकात महापूर संकट, कोरोना संकट काळात जिल्हा प्रशासन, राज्य शासनाकडून लोकांचे जगणे अधिक खडतर होत असल्याचा आरोप करत त्यांनी निदर्शने केली. ‘कोरोनात अपयशी, महापुरात तोंडघशी’,अशी टीका करत घोषणा दिल्या.

सांगलीत ‘कोरोनात अपयशी, महापुरात तोंडघशी’,अशी टीका करत घोषणाबाजी.

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘२०१९ च्या निकषानुसार पूरग्रस्तांना मदतीचे धोरण राबवायला हवे होते, मात्र इथली स्थिती कॅबिनेटपर्यंत प्रभावीपणे पोहचत नाही. मंत्री अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनात जिल्ह्याची दयनीय अवस्था आहे. महापुराने जगणे असह्य केले आहे. दोन्ही संकटांत पालकमंत्र्यांचे चुकलेले नियोजन कारण ठरले आहे. या संकटाची जबाबदारी त्यांनी स्विकारली पाहिजे. त्याउलट अभिनंद, सत्कार होताहेत. लोकांच्या जखमेवर मीठ चोळले जातेय. महापूर रोखण्याच्या विषयात कागदी विमाने हवेत उडवली जात आहेत. नदीला भिंत बांधण्याआधी इस्लामपूर-सांगली रस्ता करा. पंचगंगा नदी वळवण्याआधी शेरीनाल्याचा प्रश्‍न सोडवा. मूळ विषयापासून लक्ष विचलित केले जातेय. त्यांच्याकडून ही जबाबदारी पेलवणारी नाही.’’

ते म्हणाले, ‘‘महापुरात कोट्यावधीचे नुकसान झाले. तुलनेत मदत तोकडी आहे. २०१९ च्या महापुराशी तुलना थांबवा, तेंव्हा कोरोना नव्हता. आता दुहेरी संकट आहे. ते राहिले बाजूला, इथे गुंडगिरीला ऊत आला आहे. गुंडांच्या टोळ्या वाढल्या आहेत. कोकेन, बनावट नोटा, बीओटी व जकात चोर, मोर-लांडोर व चंदन तस्कर, पोक्सामधील आरोपी मोकाट आहेत. या टोळ्यांना राजकीय आश्रय मिळाला आहे. पालकमंत्र्यांनी एकदाही पूरग्रस्त पेठेत फिरकले नाहीत. त्यांच्या चुकांचा परिणाम जिल्हा भोगतोय. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री म्हणून पालकमंत्र्यांनी जबाबदारी वागायला हवे होते. यावेळी रेखा पाटील, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, गोपाळ पवार, रवी वाडवणे, मीरा चौगुले, जयश्री भोसले, शाबीरा शेख, शुभम चव्हाण, राहूल बोळाज आदी उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT