Queues in front of meat and chicken shops 
कोल्हापूर

मटण, चिकन दुकांनांसमोर रांगा  

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : दीपावलीत गोड खाऊन कंटाळलेल्या मासांहारी खवय्यांनी आज सकाळीच चिकन-मटण दुकानांसमोर रांगा लावल्या. शहर-परिसरात अंडी, मटण खरेदीसाठी अशीच स्थिती होती. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवेशमार्गावरील मटण विक्री दुकानांसमोर विशेष गर्दी होती. दिवाळी निमित्ताने आठवडा-पंधरा दिवस गोड खाण्यात आले. भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी होते. तर त्याच दिवशी सोमवारही होता. शक्‍यतो बुधवार आणि रविवार या दिवशी मांसाहर अधिक प्रमाणात होतो. अनेक जण सोमवार, मंगळवारी मांसाहार करत नाहीत. त्यामुळे आज बुधवारी मटण, चिकन आणि अंड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होती. 


मटण 600 ते 620 रुपये किलो, चिकन 150- 180 रुपये किलोने विक्री होत होती. विक्री होत असलेले चिकन, मटण ते दर्जेदार आहे, का? याचीही खात्री होत नव्हती. पूर्वी कत्तलखान्यातूनच दर्जाबाबत शिक्का मारून मटणाची विक्री होत होती. कत्तलखाने कमी झाले. महानगरपालिकेच्या हद्दीतही अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्याचा नियम आला. पूर्वी अन्न व औषध प्रशासन तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करत होती; मात्र आज दुकानांच्या दारांत रांगा होत्या तरीही कोणाकडूनही मटन-चिकनच्या दर्जाबाबत पाहणी झाली नाही. 


मटण, चिकन विक्री दुकानदारांची तपासणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. 2010 च्या कायद्यातील तरतुदीनुसार महापालिका हे काम करत नाही. कत्तलखान्यातून पूर्वीप्रमाणे मटणाचा दर्जा तपासून दिला जात नाही. 
- विजय पाटील, महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी 

आज मटण, चिकन विक्री दुकानांची तपासणी झालेली नाही. येथून पुढे पूर्वीप्रमाणे तपासण्या सुरू करणार आहोत. मटण-चिकनाच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होते. मात्र त्याचबरोबर महापालिका नियमानुसार कारवाई करू शकते. आमच्याकडे शहरासाठी केवळ दोन अधिकारी आहेत. त्यामुळे तपासणी करणे, कारवाई करणे शक्‍य होत नाही. 
-मोहन केंबळकर, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT